फलटण तालुक्यातील आठवडा बाजार बंद होण्याच्या मार्गावर

नवचैतन्य टाईम्स फलटण प्रतिनिधी(जावेद शेख)-फलटन शहरात दर रविवारी आठवड़ा बाज़ार भरत असतो.या बाजारात फलटण तालुक्यातील आसपासच्या सर्व चोट्यामोठया खेड़ेगावतील लोक आठवड़ा बाज़ार करण्यासाठी आणि शेतमाल विकण्यासाठी बाजरात येत असतात.तसेच प्रचंड प्रमाणात व्यापारी ही येत असतात.परंतु सध्या क़ोरोना विषाणुजन्य प्रादुर्भाव वाढल्यामुळे फलटण नगरपरिषद दि.२१/३/२०२१ पासुन आठवड़ा बाज़ार बंद ठेवल्याने आदेश दिले आहेत.लॉकडाऊन नंतर आत्ता कूठे बाज़ार सुरळीत सुरु झाले होते.आता परत बाज़ार बंद ठेवण्यांची आदेश आल्यामुळे शेतकरी,मंडई विक्रेते,फ़ळ विक्रेते,व्यापारी तसेच नागरिकांमध्ये शांततेचे वातावरण पसरले आहे.तसेच सर्वसाधारण जनतेपूढे कोरोनापासुन बचाव करावा की पोटाची ख़ळगी भरावी असा प्रश्न उभा राहीला आहे.

error: Content is protected !!