आली रे आली सोंगे आली ओझर्डे गावची अनोखी परंपरा

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(आशिष चव्हाण)-स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य या उद्घोषणेचा गजर करीत सुरू होणारा व गावचे दैवत श्री पद्मावती मातेच्या आशिर्वादाने ओझर्डे गावची लोककला सोंगे उत्सव सोहळा दरवर्षी रंगपंचमीच्या पहाटे मुख्य मिरवणूक सोहळा सुरू होतो..होळी पौर्णिमे पासून या उत्सवाला सुरुवात होते. महाराष्ट्रात प्नसिध्द श्री भैरवनाथाच्या बगाडयात्रेच्या पहाटे….
ओझर्डे येथे प्रबोधनात्मक व रंजनात्मक सोंगे उत्सव संपन्न होतो .सोंगे म्हणजे चित्ररथ, शोभायात्रा मिरवणूक होय. ओझर्डे गावचा कॉर्निव्हल सोहळाच जणू.हा उत्सव रंगपंचमीच्या पहाटे सूरू होतो. .होळीपासूनच सुरुवात होते.कोणकोण कोणत्या गाड्या बांधणार यांचे नियोजन केले जाते.निधी संकलन, प्रसंगानुसार दृश्य स्वरुपात गाडी बांधुन सजावट करणे. पात्रे निवड , साहित्य संकलन,रात्री दहा वाजता पात्रे रंगविणे.पोशाख घालून सजावट करणे.आरती करुन पात्रांना सोंगाच्या गाडीत बसविणे.यात विविध प्रसंग व घटना सादर करतात. ऐतिहासिक ,सामाजिक ,आरोग्य,राजकिय ,पौराणिक रामायण, महाभारत व नजिकच्या काळातील महत्त्वपुर्ण घटना व इतर प्रसंगाची सोंगे असतात. बांबू ,फळ्या,पडदे, झालरी, वृक्षांच्या डहाळ्या, कापूस पुठ्ठे,फ्लेक्स बोर्ड व रंगीत कागदांचा वापर करून गाड्या सजविल्या जातात .पुर्वी बैलगाडी सजवली जायची,हल्ली टॅक्टर-ट्रॉलीचा वापर करतात. दोन आळ्यांचा हा उत्सव असतो सर्वात पुढे पायदळ सोंगे,वाद्यांची गाडी, तमाशाची गाडी,गरुडावर विष्णू- लक्ष्मी,देवीचा गाडा,पाच पांडवांची गाडी ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्ररथ, श्रीकृष्ण लीला व इतर गाड्या असतात.सोंगाच्या प्रसंगानुसार गाडी सजावट पोशाख,मेकप द्वारे हुबेहुब पात्रे सजविली जातात.डेकोरेशन केले जाते.सोंगातील सर्व पात्रे पुरूषच असतात.स्त्रीपात्रही पुरूषांनाच दिले जाते. सर्वधर्मिय तरूण कार्यकर्ते यामध्ये सहभाग घेऊन गावची परंपरा जतन करीत आहेत.आनंद,मनोरंजन आणि नवनिर्मितीचा ध्यास हेच सोंगे उत्सवाचे खरे रूप ओझर्डेकर नागरिक जतन करण्याचा प्रयत्न करीत आहे.सोंगाडी गांव ओझर्डे बहुरंगी, बहुढंगी गांव लोककला जोपासून प्रबोधन करणारे गांव आत्तापर्यंतच्या उत्सवातील शेषनागावरील -लक्ष्मीविष्णू,राज्याभिषेक सोहळा,कौरव- पांडव युध्द,बावधनचे बगाड,बोंबाबोंब इंजिनिअरिंगचे कॉलेज, कालिया मर्दन,शहीद भगतसिंग व चांगदेव ज्ञानेश्वर भेट इत्यादी सोंगाच्या गाड्यांची आठवण होते.
माझा सहभाग असणाऱ्या सोंगाच्या गाड्यांचा समावेश आवर्जून करावा लागेल.बाजीराव मस्तानी ऐतिहासिक सोंग, स्वामी विवेकानंद, इंदिरा गांधी,तमाशाची गाडी, कुटूंब नियोजन आरोग्य शिक्षण.या सोहळ्याची दखल झीमराठी,सामटिव्ही व इतर अनेक चॅनेलनी घेतली आहे.

error: Content is protected !!