पुन्हा नशिबी फरपट लाॅकडाऊनची भीती परप्रांतिय मजुरांची घराकडे जाण्यासाठी धावपळ
नवचैतन्य टाईम्स पाचवड कुडाळ प्रतिनिधी(कदिर मणेर)-मागील वर्षी कोरना काळात आलेला अनुभव खूप भयानक होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक २४ मार्चच्या रात्री संपूर्ण देशात लाॅकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर सर्वांचीच धावाधाव झाली. परराज्यातून आलेल्या कामगारांना याची खूप मोठी झळ बसली. लाॅकडाऊन लागल्यानंतरही काही मजूर आपापल्या राज्यात चालत जाताना चे व्हिडिओ व्हायरल झाले होते. सध्या महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन लागेल की काय ? या भीतीने परप्रांतीय मजूर महाराष्ट्र सोडून घरचा रस्ता पकडताना दिसत आहे.राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.त्यामुळे राज्यात काही ठिकाणी लाॅकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्यावेळेसारखं संकट पुन्हा येऊ नये यासाठी परराज्यातून आलेले कामगार पुन्हा परतीच्या वाटेवर निघाले आहेत.मिळेल त्या वाहनाने हे कामगार गावी जाताना दिसत आहेत.मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतिय कामासाठी येत असतात.यातील बहुतांश लोक हे रोजंदारीवर काम करत असतात.दिवसा केलेल्या कमाईवर ते रात्रीच पोट भरतात. सरकारने लाॅकडाऊन करण्याआधीच सुचना द्यावी.जेणेकरून आमची उपासमार होणार नाही.असे या कामगारांचे म्हणने आहे.दरम्यान लहान लहान कंपन्यांमध्ये काम करणार्या कामगारांनी गावी जाण्यास सुरुवात केली आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्रात दररोज तीस हजारांच्या वर रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्याला लाॅकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.