मिनी लाॅकडाऊन विरोधात राज्यातील व्यापारी रस्त्यावर

नवचैतन्य टाईम्स पाचवड कुडाळ प्रतिनिधी(कदिर मणेर)-सरकारने अंशत; लाॅकडावून जाहीर केले आणि प्रत्यक्षात “ब्रेक द चेन” च्या नावाखाली संपूर्ण लाॅकडाऊन लागू केल्याचा आरोप करीत राज्यात ठिकठिकाणच्या व्यापार्‍यांनी रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.जिल्हा प्रशासनाने व्यापार्‍यांची दिशाभूल केली आहे. पंचवीस दिवस दुकाने बंद ठेवून कसे जगायचे असा संतप्त प्रश्न व्यापार्‍यांनी उपस्थित केला, हा “ब्रेक द चेंन” व्यावसायिकांसाठी “ब्रेक द लाईट” ठरू शकतो अशा प्रतिक्रिया व्यापार्‍यांनी व्यक्त केल्या.
दुकाने बंद पण नाराजी अंशता लॉकडाऊन म्हटल्याने नेहमीप्रमाणे दुकाने उघडी राहतील अशा विचाराने व्यापारी गाफील होते पण, जिल्हा प्रशासनाने रात्रीतून निर्णय बदलला होता. जालना जिल्ह्यातील व्यापार्‍यांनी मंगळवारी सकाळी दुकाने उघडली होती परंतु,दुपारी पोलिसांनी शहरात फिरून सर्व दुकाने बंद केली. व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली.पश्चिम महाराष्ट्र सरकारला दोन दिवसांची मुदत पुणे: आम्ही दोन दिवस वाट पाहणार आहोत दरम्यान मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती करू.ऐकले तर ठीक, अन्यथा निर्णय घ्यावाच लागेल असा इशारा पुणे शहर व्यापारी महासंघाने दिला आहे. महापालिका एक सांगते, मग राज्य सरकार दुसराच आदेश काढत आहे, अशा शब्दांत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष एडव्होकेट फत्तेचंद रांका यांनी बंदच्या विषयी संताप व्यक्त केला.कोल्हापूरातील व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवली. सातार्‍यात व्यापार्‍यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन व्यापारी यांनी आपल्या मागण्या मांडल्या. सांगलीत सलून बघता इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स, झेरॉक्स सेंटर, बुक सेंटर, हॉटेल, मॉल, छोटे बाजार दिवसभर सुरू होते.सरकारच्या निर्णयाविरोधात बुलढाण्यात सर्वत्र संताप दिसला. दुकानदार, विविध संघटना व व्यापार यांमधून विरोध होत आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे बुलढाण्यात रस्ता रोको करण्यात आला.

error: Content is protected !!