जावळी तालुक्यात परराज्यातून व परजिल्ह्यातून येणाऱ्यांना कोविड 19 टेस्ट बंधनकारक

नवचैतन्य टाईम्स जावळी प्रतिनिधी(सुनिल भोसले)आपल्या देशात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे.महाराष्ट्राची देखील भयावक परीस्थिती झालेली आहे. सातारा जिल्हयासह जावळी तालुक्यात देखील हा संसर्ग पसरलेला आहे.परराज्य व पर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी किमान 72 तास अगोदर कोविड 19 टेस्ट करणे बंधनकारक असलेल्याचे जावली तालुक्याचे इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी टोम्पे यांनी आदेश दिले आहेत.कोराना संसर्गाने सर्व देश विदेशात थैमान घातले आहे.गेल्या वर्षी लाॅकडाऊन झाल्यावर आपल्या गावी जाणाऱ्या लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. या वेळी ही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.आपल्या गावी आल्यावर आपल्या पासून दुसर्‍याला त्रास होवू नये यासाठी येण्याअगोदर आपापली कोवीड 19 टेस्ट करणे अतिशय गरजेचे आहे.गेल्या वर्षीच्या काळात अनेकांनी विना टेस्ट करता गावाकडे धाव घेतल्याने त्याचे अतिशय वाईट परिणाम गावोगावी झाल्याचे दिसून आले.त्यामुळे ह्यावेळी जावळी तालुक्यात परराज्यातून व पर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी कोवीड 19 टेस्ट बंधनकारक आहे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जावळी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे यांनी गावाला येणाऱ्यांसाठी कोविड 19 टेस्ट बंधनकारक असल्याचे आदेश दिले आहेत.

error: Content is protected !!