डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या प्रयत्नाला यश श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज निवासी मठाच्या जागे ऐवजी इतर ठिकाणी कोव्हिडं-१९ सेंटर सुरू करण्यात येईल
नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(शरद झावरे)-विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांचे स्थानिक प्रशासनास यासंबंधी लवकरच आदेश देणार.ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थांना ता.दहिवडी,जि .सातारा येथील देवस्थानच्या मठाची जागा कोव्हिडं-१९ साठी सेंटर घेण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहिती मिळाल्यानंतर उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच विभागीय आयुक्त यांना पत्र दिले होते. यात सदरील जागा ही दाट वस्तीत असून येथे कोव्हिडं सेंटर न करता दुसऱ्या ठिकाणी सेंटर उभारण्याबाबत पत्र दिले होते.संस्थानमध्ये नित्य उपासना विधी चालत असून, अनेक जेष्ठ वयानं भाविक तसेच त्यातील काहींना आजार असणारी सेवेकरी निवासास आहेत. त्याचबरोबर शिष्य तिथे साधना करीत असतात. जिल्हाधिकारी, सातारा यांनी जवळच्या वडूज, दहिवडी, म्हसवड येथे कोविड केंद्रासाठी पुरेशा जागांचा पर्यायाचा विचार करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी प्रशासनास केली होती. परंतु संस्थानचीच जागा घेण्याची स्थानिक प्रशासन आडमुठी भूमिका घेत आहे. या ईतर ऊपलब्ध जागा आरोग्यसेवांशी संलग्न देखील होऊ शकतात. सदर गोंदवलेकर महाराज निवासी मठ संस्था स्थानिक प्रशासन, राज्य शासन तसेच केंद्राला व स्थानिक नागरिकांना मोठ्याप्रमाणात मदत आणि सहकार्य करत असताना अशा प्रकारे व्यवहार करणे म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या भक्तात आणि स्थानिक तिढा निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक तर स्थानिक प्रशासन करत नाही ना अशी शंका देखील ना.डॉ.गोऱ्हे यांनी यापत्रातून उपस्थित केली होती.
यासंदर्भात आज ना.डॉ.गोऱ्हे यांनी विभागीय आयुक्त श्री सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा करून दहिवडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या सुसज्ज आश्रमशाळा, तसेच इतर शाळा, मंगल कार्यालय घेण्याची सूचना केली होती. यासंदर्भात तात्काळ गोंदवलेकर संस्थांची जागा न घेता दुसरी पर्यायी जागा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांना आदेश देण्यात येतील असे श्री राव यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांना सांगून आश्वासित केले. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे ना.डॉ.गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे. तर सदरील निर्णय घेतल्याबद्दल संस्थांने डॉ.गोऱ्हे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.