आजचे राशिभविष्य दिनांक २५एप्रिल २०२१

नवचैतन्य टाईम्स पनवेल प्रतिनिधी(कल्याणी मोरे)
रविवार २५ एप्रिल रोजी हस्त नक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे १२ पैकी ६ राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या ६ राशीच्या लोकांना दिवस धावपळीचा आणि धनहानीचा राहू शकतो. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
वरिष्ठ तुमच्याशी गोड बोलून कामे करून घेतील. आज प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. पत्नीची आज्ञा पाळणे हिताचे.

वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : ६
कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू आहे. आज सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. आज स्वत:चे लाड पुरविण्यासाठी खर्च कराल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : १
आर्थिक बाजू उत्तम असेल. घर सजावटीच्या काही शोभिवंत वस्तूंची खरेदी कराल. मुलांचे लाड पुरवाल. आज आईने दिलेले सल्ले योग्य ठरतील.

कर्क : शुभ रंग : क्रिम| अंक : ८
काही कौटुंबिक अडचणी तुम्हाला त्रस्त करतील. काही कारणास्तव प्रवास घडतील. आज वाद टाळा.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ९
आज तुम्ही अत्यंत आनंदी व उत्साही असाल. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी|अंक : ६
हट्टीपणास लगाम घाला. इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवायला हवी. कार्यक्षेत्रात सतर्क राहा.

तूळ : शुभ रंग : राखाडी| अंक : ७
काही मोठे खर्च दार ठोठावतील. गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. प्रवासात मौल्यवान वस्तू जपा.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : ५
बऱ्याच दिवसांपासूनची तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. दुरावलेले मित्र जवळ येतील.

धनू : शुभ रंग : भगवा|अंक : ३
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
थोरांशी मतभेद होतील. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा प्रयत्न न करता, त्यांच्या वयाचा मान राखा.

कुंभ : शुभ रंग : पांढरा|अंक : २
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. कायद्याची चौकट मोडू नका.

मीन : शुभ रंग : गुलाबी|अंक : ४
एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने करणार आहात. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी.

error: Content is protected !!