वालचंद नगर पोलिसांनी पकडला धारधार शस्त्रसाठा

नवचैतन्य टाईम्स इंदापूर तालुका प्रतिनिधी(जावेद मणेरी)
वालचंद नगर पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून सुरू केलेल्या संचार बंदी च्या पेट्रोलिंग दरम्यान अनेक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यामध्ये ती पॉझिटिव आली आज पोलिसांनी संशयित दुचाकीस्वारांला पकडून त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून दहा घातक हत्यारे ताब्यात घेतली. पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. यामध्ये इंदापूर बारामती रस्त्यावर एक संशयित दुचाकीस्वार वालचंदनगर रस्त्यावर काहीतरी पार्सल घेऊन येत असल्याचे दिसले. त्यावरून त्याला थांबून चौकशी केली असता व त्याच्या दुचाकीवरील साहित्याची तपासणी केली असता त्यामध्ये 10 धारदार शस्त्रे आढळून आली त्यावरून शेळगाव तालुका इंदापूर येथील सचिन गंधारे याची पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली आणि त्याला अटक केली सचिन गंधारे याच्यावर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात घातक शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार फौजदार अतुल खंदारे पोलीस हवालदार श्री माने श्री वायसे श्री चितकोटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

error: Content is protected !!