सहज निर्मल रचना

सहजी असोनी,उदास वाटती!
चिंतातुर होती! जीवनात!!१!!
सहज सन्मान,बहु वाढवती!
परि ते नेणती ! समर्पण !!२!!
व्यर्थची धावती,होऊनिया दीन!
नसे तन मन !माझे ठायी!!३!!
चुकीचे करती,मग समर्थन!
सोडती अनन्य!भक्ती माझी!!४!!
दासशंभु म्हणे,दिशाहीन होती!
जाती अधोगती!अन्य मार्गी!!५!!
—————————————-
परम चैतंन्य ठराविक साधकांचीच योजना अचूकपणे
करते.असे साधक निर्भिड व संकटांशी सामना करुन जीवन व्यतीत करणारे असतात.जीवनातील अत्यंत महत्वाच्या क्षणी अंगलट आलेली भयानक संकटे विलय पावतात कशी?या विचाराने साधकांचा आत्माजागृत होतो व विवेक बुद्धी जन्म घेते.अनुभवांचे संस्करण अंतर्मनात वाढत जाते.पाठीमागे व कमरे खालील भागातील स्नायु व दोन्ही खांद्यावरील स्नायु आपोआप स्फुरण पावतात.कुंडलिनी आपणास शुध्दता प्रदान करते आहे.या एकमेव विचारांनी त्यांचे चित्त सदैव उर्ध्व बनते. मग दुसऱ्याच्या जीवनात चैतंन्य लहरी कार्यान्वित कला सहज प्राप्त होते.तसे सहजाचे सारे ज्ञान अगोदरच आईच्या संभाषणातून अमर झाले आहे तरी त्या ज्ञानाची सांगड व अनुभुती आपल्या वैयक्तिक जीवनात का पसरत नाही.यांचे आत्मचिंतन केले पाहिजे.काहींची प्रगती नसल्याने ते उदास व आळशी दिसतात.सहजात ते अनेक कामे करतात.परंतू ध्यानात व समर्पणात कमी पडतात.तनमनाने एक होत नाहीत.चुकीचे समर्थन करुन सहजातुन बाहेर पडतात.श्री माताजी म्हणतात मानवाच्या पुनरु त्थानाचा हा काळ आहे.मानवी अस्तित्वामधुन आपल्याला वरच्या स्थिती पर्यंत उन्नत व्हायलाच हवे.आणि हे घटीत झाल्यावर जीवना मध्ये कसे परिवर्तन होते.तुम्ही समाधानी कसे होता.दुसऱ्याचा द्वेष करणे किंवा त्याला त्रास अपाय करणे इ.फालतु दुर्गुण कसे गळुन पडतात हे त्याला दिसायला हवे.तुम्हाला खुप सहनशिल,क्षमाशिल व्हावे लागेल. तुमच्या जीवन प्रणाली मधुन तुमच्या आत्म्याचे प्रतिबिंब बाहेर दिसणार आहे.आत्मा एकदा प्रकाशित झाल्यावर सर्वप्रथम तुम्ही गुणातीत,धर्मातीत होता.मानवी स्वभाव गुणापलिकडे जाता.मग तुम्ही जे करता ते धर्मानुसार चालते.तुमचे चित्त दुसऱ्यांचे दोष पहात नाही.सहज योगी सर्व परिस्थितीत आनंदी असतो.जरी मृत्यू समोर आला तरी.कोणी रागावले तर साक्षी भावानेच पाहतो.माणूस स्वतःकडेच पाहू लागतो.अहंकार कमी होतो.आ त्म्याचा प्रकाश मिळाल्यावर तुम्ही कोणाचेही गुलाम रहात नाही. दास शंभु आपणास विनंती करतो की,सहजातील स्वातंत्र्य खरे आहे.आत पहाणे व शक्ती च्या सहवासात असणे हे भाग्यवंत सहजीचा स्वभाव झाला पाहिजे.तरच आईंना आनंद वाटणार आहे.
—-दासशंभु म्हणे—-

error: Content is protected !!