ज्ञानदीप लावू जगी:विठ्ठल म्हण कारे वाचा
नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(कदिर मणेर)
अगा मर हा बोलू न साहती। आणि मेलिया तरी रडती।परि असतें जात न गणिती।गहिंसणें।।
श्री ज्ञानेश्वरीतील नवव्या अध्यायात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, कोणी एखाद्याला जर तू ‘मर’ असे म्हटले तर ते त्या व्यक्तीला सहन होत नाही आणि जर कोणी मेले तर रडत बसतात.
पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे , त्यांना मूर्खपणामुळे समजत नाही .ठिकठाक असताना आपल्याला मरणाची आठवण होत नाही.
मात, एखादी करोना सारखी महासाथ आल्यावर मरण हा काय प्रकार आहे हे कळते, राजा असो किंवा नोकर मरण हे कोणालाच चुकत नाही.
माऊली म्हणतात, भ्रम धरीसीं या देहाचा। विठ्ठल म्हण का रे वाचा। पडोनि जाईल कलेवर।विठ्ठल उच्चारी पा सांर।।या देहाचा तुम्ही कितीही मोह धरला तरी एकदा कधीतरी मरण ठरलेले आहे.त्यामुळे सर्वनामाचे सार जे विठ्ठल नाम आहे ते तुम्ही वाचेने घेत राहा.