वाई पोलिसांनी बुधवारी 30 दुचाकी वाहन चालकांवर केली कारवाई

नवचैतन्य टाईम्स वाई तालुका प्रतिनिधी(धनश्री फरांदे)-वाई कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाई प्रशासनाच्या वतीने वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.त्या अनुषंगाने विनाकारण फिरणाऱ्याना मनाई करण्यात आली आहे तरीसुद्धा काही वाईकर विनाकारण घराबाहेर पडत आहेत.अशा विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर वाई पोलीस कारवाई करत आहेत. बुधवारी सकाळी या कारवाईला वाई पोलिसांनी शहरात सुरवात केली.सायंकाळ पर्यंत वाई शहरात 30 दुचाकी व चालकांवर कारवाई करून दंड वसूल केला गेल्या दोन दिवसात 73 दुचाकी चालकांवर कारवाई करून 10,500 रुपयांचा दंड वसुल केला यांची माहिती वाई पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिली.

error: Content is protected !!