रयतेचे राजे
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)
कल्पना आली एकदा मनात
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र
अभिमान वाटे सर्वांना, पाहून आदर्श स्वराज्य. एक युग होते एक युग होते
जेव्हा शिवरायांचा जय जय कार होता
तलवार त्यांच्या पराक्रमाची धार होती
मनात आदर्श स्वराज्याची संकल्पना.
तेव्हाचा बळीराजा सुख समृद्ध होता
दुष्काळात तो मायेच्या सावलीत होता
माता भगिनी निर्भीडपणे जगत होत्या
तेव्हा आठवा, आजचा फरक
युवकांनो तुम्हीच घ्या हातात
स्वराज्याची ज्वलंत मशाल
दाखवा जगाला सर्वांना
आपल्या राजाचा आदर्श इतिहास
दुष्काळाची, दहशत वादाची काय बिशाद उभे ठाकण्याची
घ्या जबाबदारी युवकांनो
तुम्ही आपल्या थोर माऊलीची
संस्कार करणाऱ्या बापाच्या कष्टाच्या मोलाची, मनगटावर राखी बांधणार्या भगीनीच्या रक्षणाची
शिवरायांचा तो युवक, झटत होता
माऊली संतांची शिकवण देत होती
बाप राष्ट्रहिताचे धडे देत होता
एक कवी म्हणून आली माझ्यावर जबाबदारी.
सांगीन मी काव्यातून, सर्व जगाला
छत्रपती शिवरायांचे चरित्र
जे जगाला सांगत आहे
कसे असावे आदर्श स्वराज्य
सांगेन मी युवकांना त्यांचे कर्तव्य
शेकडो काव्यातून सांगीन मी
प्रबोधनाचे शिवरायांचे धडे
व्यसनमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त नवी पिढी, जी असेल उद्याच्या भविष्याची पायाभरणी
घेतली आहे आम्ही उत्तुंग झेप
पण आजही संस्कृतीचा आमच्या आदर.
समाजकार्याची प्रतिमा जागवून
सांगितले शिवरायांनी आम्हाला
कसे जगावे, कसे मरावे
आणि कसे रमावे लोक सेवेत.
तेव्हा सबंध महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रथम मानाचा मुजरा. आज आपल्या स्वराज्यावर कोरो ना संकट गंभीर झालेले आहे. जेव्हा जेव्हा आपल्या स्वराज्यावर संकटे आली. ते परकीय आक्रमणास असेल किंवा इतर संकटे असतील, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्वराज्याला एकत्र घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून गनिमीकाव्याने प्रत्येक संकटाला उत्तर दिले व आदर्श स्वराज्य निर्माण केले. तेव्हा आजच्या संकटात ही आपण शिवरायांचे तेज सूत्र तीच व्यूहरचना अवलंबणे गरजेचे आहे. तेव्हा शासकीय यंत्रणा ,प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक या तिघांनी एकत्र येऊन अभ्यास पूर्वक या संकटाला उत्तर द्यावे. तेव्हा हे संकट नक्कीच दूर होऊन परत एकदा आपले स्वराज्य हे सुख समृद्धीचे व आनंदात रमून जाईल. हीच आई भवानी चरणी प्रार्थना. धन्यवाद
कविराज अमोल मांढरे वाई.
Mobile.7709246740