गृपमध्ये का रहावे? खुपच सुंदर लेख आहे अवश्य वाचा
नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी(शेखर तलाठी)
एका छोट्याशा गावात सर्वजण एकमेकांना ओळखत होते . ठराविक कालांतराने ते सर्वजण एकमेकांना भेटत. काहीतरी कारण काढून एकत्र येण्यावाचून त्यांना चैन पडत नसे. त्यात छोटी मोठी कुटुंबे , मित्रांचे ग्रुप , काही एकटी माणसे असे सर्वजण होती .
एक मध्यमवयीन एकटा रहाणारा एक माणूस या बैठकांचा नियमित सदस्य होता. सर्व सामुदायिक कार्यक्रमात त्याचा हिरीरीने सहभाग असायचा . त्याची उपस्थिती सर्वांसाठी आनंददायक असायची .
मात्र काही काळापासून या नियमितपणे कौटुंबिक आणि समूहाच्या सभांना नियमितपणे हजर राहणाऱ्या माणसाने, कोणतीही सूचना न देता, भाग घेणे बंद केले.
त्याची वाट पाहून काही आठवड्यांनंतर, गावातील वृद्ध सरपंचाने त्याच्या घरी जाऊन कारण शोधण्याचे ठरवले.
एका हिवाळ्याच्या गारठलेल्या संध्याकाळी सरपंच त्या माणसाच्या घरी गेले.
त्या माणसाने शेकोटी पेटवली होती , आणी थंडीत उब मिळवण्यासाठी तो एकटाच , शांतपणे बसला होता .
त्या माणसाने सरपंचाचे स्वागत केले. त्यांच्यात फार काही संवाद झाला नाही . नुसते अभिवादन फक्त .
त्यांच्या मूक संवादापेक्षा शेकोटीत जळणाऱ्या लाकडांचा आवाज जास्त होता .
दोघेही शेकोटीच्या ज्वालेकडे शांतपणे बघत बसले .
काही मिनिटांनंतर सरपंच उठले, त्यांनी त्या शेकोटीमधील एक मोठी लाकडाची जाळणारी फांदी , शेकोटीतून बाजूला काढली . आणी परत जागेवर जाऊन बसले.
तो माणूस हे सर्व निर्विकारपणे पहात होता .
थोड्या वेळात त्या बाजूला काढलेल्या लाकडाच्या फांदीतील ज्वाळा कमी झाली. अगदी विझलेल्या अवस्थेत आल्यानंतर ती फांदी अगदी काळी दिसू लागली . थोड्या वेळापूर्वी प्रकाशमान तेजस्वी असणाऱ्या त्या लाकडात आता काहीही उरले नव्हते . तो एक निर्जीव काळा लाकडाचा तुकडा उरला होता .
अजूनही दोन्ही व्यक्तीमध्ये काहीच संवाद झाला नव्हता .
निघण्याची तयारी करण्यापूर्वी, सरपंचाने तो लाकडाचा निरुपयोगी तुकडा उचलला आणि तो पुन्हा आगीच्या मध्यभागी ठेवला.
ताबडतोब, तो लाकडाचा तुकडा पुन्हा जागृत झाला, पुन्हा तो तेजस्वी दिसू लागला.
जेव्हा सरपंच निघणार होते आणि दारात पोहोचला होते , तेव्हा तो माणूस म्हणाला:
‘तुमच्या येण्याबद्दल आणि तुमच्या सुंदर शिकवणीसाठी धन्यवाद. मी लवकरच ग्रुपमध्ये परत येईन . ’
आपल्या जीवनात ग्रुप, समुदाय का महत्वाचा आहे?
कारण मागे राहिलेला प्रत्येक अविकसित सदस्य , बाकीच्या मित्रांकडून उर्जा, तेज घेतो.
ग्रुपच्या सर्व सदस्यांना ते एकत्र उर्जेचा, ज्वालेचा, भाग आहेत याची जाणीव असणे हे खूप महत्वाचे आहे
हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आणी धीर देणारे आहे कि आपण सर्वजण एकमेकांची ज्योत तेजस्वी ठेवण्यास जबाबदार आहोत.
ग्रुप देखील एक कुटूंब आहे
कधीकधी आपण काही मेसेजेस, भांडणे आणि गैरसमजांनी कंटाळलो तरी हरकत नाही.
एकमेकांशी संपर्क असणे महत्वाचे आहे .
आपण येथे भेटण्यासाठी, संदेश देण्यासाठी, शिकण्यासाठी, कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी आहोत आणी आपल्यापैकी कोणीच एकटे नसल्याचे जाणून घेण्यासाठी येथे आहोत.
चला ज्योत जिवंत ठेवूया.🙏🙏🌹🌹