कोविड,मधुमेह आणि म्युकर

नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी(शेखर तलाठी)-गेल्या वर्षांपासून आपण कोविड या आजारचा लढा लढत आहोत.पहिल्या लाटेनंरत आता दुसऱ्या लाटेमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी लक्षात येते आहेत.उपचार पद्धती मध्येही जसजसं आजाराचं आकलन वाढतंय तसा वैद्यकीय दृष्ट्या बदलही होत आहे.पण काही दिवसांपासून एक नवीन चॅलेंज डॉकटरांसमोर उभे राहिले आहे,ते म्हणजे म्युकर मायकोसिस !म्युकर मायकोसिस या बुरशीच्या प्रदूर्भावाने सध्या भयावह परिस्थिती निर्माण होत आहे.त्यासाठी म्युकर का होतो आणि कसा टाळावा हे समजून घेण्याची आणि त्यावर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.म्युकर मायकोसिस हा सोप्या शब्दात सांगायचे तर बुरशीचा प्रकार आहे.घरामध्ये शिळ्या अन्नपदार्थावर प्रत्येकाने हे कधीना ना कधी पहिला आहे.विशेषतः ब्रेडवर किंवा पूर्वी लोणच्याच्या बरणीत हा हमकास आपण पाहिला असेल. एखाद्या पदार्थाला बुरशी लागण्याची कारणेही आपल्याला माहीत आहेत.कोंदट वातवरण,आद्रता* हे बुरशीसाठी योग्य वातावरण असते,त्याचबरोबर व्यवस्थित खाद्य असेल तर मग दुग्ध शर्करा योगच!!! आशा वातावरणात बुरशीची वाढ झपाट्याने होते.कोविड पेशन्ट मध्ये उपचारादरम्यान आपण वर पाहिलेले वातावरण सहज निर्माण होते.कोविड उपचारासाठी स्टिरॉइड प्रकारातील औषधे ही आवश्यक असतात, हे आता सर्वांना माहीत झाले आहे.परंतु स्टिरॉइड ही दुधारी तलवार आहे,याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.स्टिरॉइडमुळे पेशंटची प्रतिकारशक्ती कमी होते,एक बाजूने हे पेशंट ला कोविड पासून बर करत असते पण त्याच वेळी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे बुरशीजन्य प्रादुर्भावाचा धोका वाढवतं. शिवाय बहुतांश कोविड पेशंटला ऑक्सिजन द्यावा लागतो जो आद्रता युक्त असतो.ह्या दोन परिस्थितीत बुरशी वाढीसाठी अनुकूल आहेत. आता राहिला खाद्याचा प्रश्न.स्टिरॉइडमुळे पेशंटच्या रक्तातील साखर वाढते,जे बुरशीसाठी मेजवानी ठरते. अशा प्रकारे कमी झालेली प्रतिकारशक्ती, आद्रता आणि वाढलेली साखर हे कोविड पेशन्टमध्ये म्युकर मायकोसिस होण्यास साहाय्य करते.म्युकरचे इन्फेक्शन हे खूप वेगाने परसरणारे आणि वेळीच त्याला अटकाव न घातल्यास प्राणघातक ठरू शकते,खरतर आताच्या कोविड च्या परिस्थितीत असे सांगणे म्हणजे अजून भयभीत करण्यासारखे वाटू शकते पण एक डॉक्टर म्हणून म्युकरची तिव्रता आपणा सर्वांना माहीत करून देणे आणि ते टाळण्यासाठी काय करावे हे सांगणे माझे कर्तव्य आहे.आता आनंदाची बाब म्हणजे म्युकर टाळता येतो.कोविड पेशन्टमध्ये स्टिरॉड आणि ऑक्सिजन हे बंद करणे शक्य नाही.मग राहिला प्रश्न फ़क्त साखरेचा.1.कोविड झालेल्या बहुतांश पेशन्टमध्ये (होम quarantine किंवा ऍडमिट असलेल्या) स्टिरॉड ची औषधे चालू असतात.अशा सर्व पेशंटनी उपचार सुरु करताना आपली रक्तशर्करा तपासून घ्यावी.
2.मधुमेह नसलेल्या पेशन्टने सुद्धा रक्तशर्करा तपासावी कारण स्टिरॉड मुळे आपल्याला मधुमेह नसेल तरीही साखर वाढू शकते.
3.मधुमेह असलेल्या पेशन्टमध्ये ती खूप जास्त वाढू शकते त्यामुळे आवश्यक असल्यास पूर्वीचीच औषधे परस्पर चालू न ठेवता आपल्या मधुमेह तज्ञाचा सल्ला घेऊन योग्य तो बदल करून घ्या.
4.पूर्वी मधुमेह नसलेल्या पेशन्टमध्ये कोविड उपचारादरम्यान साखर वाढत असल्यास त्याचा योग्य उपचार सुरू करून साखर नियंत्रण करणे आवश्यक आहे.
5.आपल्याकडे ग्लुकोमीटर असेल तर घरच्या घरी जोपर्यंत कोविड चे उपचार सुरू आहेत तोपर्यत दररोज साखर तपासा.त्यामध्ये वाढ वाटल्यास मधुमेह तज्ञाचा सल्ला घ्या
6. बहुतांश पेशन्टमध्ये साखर नियंत्रणासाठी तात्पुरत्या इन्शुलिनची आवश्यकता भासू शकते
7 Home quarantine पेशन्ट नी किमान ५ दिवसांनी आपली साखर तपासली पाहिजे,आपली साखर नॉर्मल असली तरीही
8.पेशन्ट कोविड मधून बरा झाल्यानंतर ही साखर नियंत्रण तितकेच महत्त्वाचे आहे. आपण युद्ध जिकल्याच्या भावनेत म्युकर या शत्रूला विसरता कामा नये.कोविड बरा झाल्यानंतर पेशन्ट शुगर कडे कानाडोळा करतो आणि पुढील काही दिवसातच म्युकर इन्फेकॅशनd इतर काळजीसोबत रक्तातील साखर उत्तम नियंत्रणात ठेवणे हा म्युकर टाळण्याचा राजमार्ग आहे.
10 .रक्तशर्करा पातळी किती असावी याचा ढोबळ आकडा द्यायचा तर *खाल्ल्यानंतर 2 तासांनी तपासलेली साखर 200 mg पेक्षा कमी*(180 पेक्षा कमी ठेवता आली तर उत्तमच) ठेवण्याचा प्रयन्त करावा.काही पेशन्टमध्ये साखरेचे प्रमाण त्याच्या इतर आजारांच्या स्वरूपानुसार आणि पेशन्टच्या इतर बाबींनुसार (उदा. वय,रक्ताचे इतर रिपोर्ट, आहार इ.) वेगळे असू शकते.पण स्टिरॉड मुळे कधीकधी हे साध्य करणं अवघड होते.परंतु मधुमेह तज्ञाचा सल्ला आणि औषधे यामुळे ती जास्तीत जास्त चांगली नियंत्रणात आणण्याचा प्रयन्त सातत्याने करणे आवश्यक आहे.
तेव्हा म्युकर या बुरशी चा प्रादुर्भाव टाळणे हेच अधिक गरजेजचे आहे .
कोविड टाळण्यासाठी मास्क,हाताची स्वछता आणि social distancing याला पर्याय नाही.आणि **कोविड झलाच तर प्रथिने युक्त आहार(डाळी, अंड्याचा पांढरा भाग),कोविड चे योग्य वेळी आणि योग्य उपचार,उत्तम साखर नियंत्रण ही त्रिसूत्रीच महत्वाची आहे.
डॉ.जयदीप रेवले,
मधुमेह तज्ञ ,सातारा
drrevales@gmail.com

error: Content is protected !!