उस्मानाबाद जिल्ह्यातील आळणी येथील स्वाधार मतिमंद मुलींच्या बालगृहात 51 विद्यार्थीनींसह 2 कर्मचारी कोरोना बाधित
नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)-
उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील स्वाधार मतिमंद मुलींच्या बालग्रहात 51 विद्यार्थिनीं सह 2 कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दि. 11 रोजी भेट देऊन उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली.
कोरोना बाधित विद्यार्थिनींना इतरत्र हालवून गौरसोय करण्यापेक्षा त्याच वस्तीग्रहात आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली काळजी घेण्यात यावी.त्यांना बालग्रहातच गरज पडल्यास आरोग्य सुविधा,औषधे,जेवण पुरवण्याची जबाबदारी शिवसेना पक्षाच्या वतीने व प्रशास्कीय अधिकऱ्यांनी स्वीकारली.तसेच त्यांची दररोज तापेची व ऑक्सिजनची तपासणी करून काळजी घ्यावी.अशा सूचना करण्यात आल्या.यावेळी कळंब – उस्मानाबादचे आ.कैलास घाडगे -पाटील,नगरअध्यक्ष नंदूभैय्या राजे निंबाळकर,तालुका प्रमुख सतिश सोमाणी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, जिल्हा वैदयकीय अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे,मुख्यायापक गुरुनाथ थोडसरे,संस्था प्रमुख शहाजी चव्हाण,पत्रकार देविदास पाठक,आरोग्य अधिकारी डॉ.मोरे,आरोग्य सेविका श्रीमती टेकाळे,आदी उपस्थित होते.