भारतीय संस्कृती एक आदर्शच
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)भारतीय संस्कृती ही फार पूर्वीपासूनच जगासमोर एक आदर्श आहे. आपल्या देशाला अनेक थोर महापुरुषांची पार्श्वभूमी आहे.या महापुरुषांनी केलेले उल्लेखनीय कार्य व शिकवणूक याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमानच आहे.जगाच्या पाठीवरील एक खंबीर युवाशक्ती ज्याची कीर्ती व सन्मान सातासमुद्रापार आजही सदैव टिकून आहे. विविध जाती धर्म कला,क्रीडा,संस्कृती यांनी विविधतेने नटलेल्या समाजाला आपण सर्वांनी एकजुटीने बांधून ठेवलेले आहे.पूर्वीपासून चालत आलेली रूढी परंपरा आणि आजच्या एकविसाव्या शतकातील जगासमोरील बलशाली राष्ट्र या दोघांचा समतोल आपण सर्वांनी राखून ठेवला आहे.पारतंत्र्यात असताना थोर नेत्यांनी आपल्या बलिदानाने व परकीय आक्रमणापासून आपल्या वीर जवानांनी लढा देऊन आपले संरक्षण केलेले आहे. हा जगा समोर एक आदर्शच आहे.आपल्या देशातील युवक वर्ग जे भविष्यात देशाचे आधारस्तंभ आहेत ते आज स्वतः बरोबर समाजहित जोपासत आहेत.येथील विविधतेने नटलेली संस्कृती,ऐतिहासिक स्थळे,निसर्ग सौंदर्य,त्याचबरोबर उत्तम दर्जेदार शैक्षणिक संस्था हे सर्व पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणत आहेत.त्याचबरोबर आपल्या भारत देशातील योगाभ्यास,आयुर्वेद,भारतीय संस्कृती,स्वदेशी,वस्तू दर्जेदार शैक्षणिक संस्था आणि त्यामधून उत्तम प्राविण्य मिळवून यशस्वी होणारे विद्यार्थी या सर्व आपल्याकडील जमेच्या बाजू आहेत. त्याचबरोबर आपल्या भारतवर्षाचे एक वैशिष्ट्य असे आहे की, आपण जरी लष्करी दृष्ट्या संपन्न असलो तरी, आपण स्वतःहून कुठल्याही देशावर आक्रमण केलेले नाही.परंतु सद्यस्थितीत, आपले शत्रू राष्ट्राने जर आपल्या देशावर वाकड्या नजरेने बघितले तर त्याचे सडेतोड उत्तर त्यांच्याच भाषेत देणे हा आपल्या भारताचा इतिहास आहे.आपल्या महाराष्ट्राचेच नव्हे तर सबंध भारत देशात आदर्श असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श स्वराज्याचा आपल्या देशाला अनमोल असा वारसा आहे. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास आज जगातील बलाढ्य देश करत आहेत.तेव्हा याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान नक्कीच आहे,परंतु तो टिकवून ठेवणे हे आपलं युवक वर्गाचे आद्यकर्तव्य आहे.जरी आपण वाढत्या जागतिकीकरणात प्रगतीची उत्तुंग झेप घेत असलो तरी आजही आपल्या भारतीय संस्कृतीचा जगासमोर एक आदर्श आहे. विविध जाती धर्माचे लोक त्यांची संस्कृती,अशा विविधतेने नटलेल्या भारत देशाचा सर्वांनाच एक आकर्षणाचा विषय ठरला आहे.आज आपल्या देशातील गुणवंत विद्यार्थी यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या भारतीय संस्कृतीचा मान ठेवून परदेशात न जाता आपल्या देशातच उत्कृष्ट काम करून नावलौकिक मिळवावा. यासाठी सर्व नागरिकांना बरोबरच शासनाची ही खंबीर भूमिका गरजेची आहे. त्यासाठी शासनाने अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवीण याला योग्य तो मान व दिशा देऊन त्यांचा विकास करावा.त्यासाठीच मेक इन इंडिया ही आत्ताची योजना ही तितकीच महत्त्वाची आहे.
तेव्हा सर्व लहान थोरांनी आपली भारतीय संस्कृती एक आदर्शच आहे याचा अभिमान बाळगून व भविष्यात ती टिकवून ठेवण्याची शपथ आपण सर्वांनी घेणे गरजेचे आहे. तेव्हा जगाच्या पाठीवरील सुवर्णभूमी अशी आपली ओळख जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.धन्यवाद.जय हिंद.जय भारत.जय महाराष्ट्र.
कविराज अमोल मांढरे वाई.
Mobile.7709246740