महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या हिंगोली समन्वयपदी वंचितच्या डॉक्टर चित्रा कुर्हे यांची निवड

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी (दिनेश लोंढे)-हिंगोली फॉरेन रिटर्न सरपंच, डिग्रसवाणी डॉ. चित्रा अनिल कुर्हे यांची महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबई या सरपंच संघटनेच्या हिंगोली जिल्हा समन्वयक पदी नुकतीच निवड झाली आहे.डॉ.चित्रा कुर्हे या आदिवासी समाजातील उच्च शिक्षित आहेत. ज्यांनी राज्यशास्त्रामधून स्पेन या देशातील सॅंटियागो विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे. सध्या त्या भारतामधील एवढ्या शिकलेल्या व त्याही आदिवासी समाजातील एकमेव सरपंच आहेत. यूरोपीय देशातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी आपल्या मायदेशात येऊन समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रा मध्ये स्थापन झालेल्या सरपंच परिषदेवर त्यांची हिंगोली जिल्हा समन्वयक म्हणून नुकतीच निवड झाली आहे. महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या हिंगोली समन्वय पदी त्यांची निवड झाल्याने वंचित बहुजन आघाडीला मिळालेला हा एक सन्मानच आहे.

error: Content is protected !!