लाॅकडाऊनमध्ये खोदली विहीर रहिमतपूरच्या पठाण कुटूंबीयाकडून वेळेचा सदुपयोग केवळ ३००रुपये खर्च
नवचैतन्य टाईम्स रहिमतपूर प्रतिनिधी(समिर मुल्ला)-लाॅकडाऊनच्या काळात घरीच राहून मोकळ्या वेळेचासदुपयोग करत येथील पठाण कुटूंबीयांनी १५ ते १६ दिवसांत २३ फूट खोल विहीर खोदली.त्यासाठी त्यांना ३००रुपये खर्च अाला. कोरोना काळात कामधंदे बंद असल्याने सर्वसामान्यांची मानसिकता ढासळत असताना पठाण कुटूंबीयांनी निवडलेला मार्ग त्यांना नक्कीच उर्जा देईल कोरोना संकट काळात सर्वत्र घोंगावत असताना बाधितांची संख्याकमी करण्यासाठी शासनाकडून लाॅकडाऊन करण्यात अाले अाहे. हातावरचे पोट असल्याने पहिल्यापासून कष्ट करण्याची सवय असलेले जावेद पठाण हे वाहन दुरुस्त करतात.तर महिबूब पठाण हे दिवसभर कुल्फी विक्रीचा व्यवसाय,पहाटे व रात्री मिळेल ते काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात.परंतु;लाॅकडाउनमुळे पुर्ण व्यवसाय ठप्प असल्याने घरी बसून दिवस काढण्यापेक्षा मिळालेले वेळ ही संधी समजून पठाण कुटूंबीयांनी पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी घरामागील जागेत विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.ईदच्या दुसर्या दिवशी ता.१५ मे रोजी सकाळी अाठ वाजता जावेद,महिबुब,शफीक पठाण हे बंधू व फैजान पठाण यांनी विहीर खोदण्यास सुरूवात केली.घरातील इतर मंडळी जमेल त्या पध्दतीने मदत करतच होते. ही विहीर काढण्यासाठी त्यांनी फक्त घरगुती वस्तूंचा वापर केला.विहीर खोल गेल्यानंतर माती बाहेरकाढण्यासाठी दुचाकीचा वापर करून माती बाहेर काढण्यात अाली. या संपूर्ण विहीरीसाठी फक्त माती काढण्यासाठी दुचाकीला तीन लिटर पेट्रोल लागले अाणि तोच खर्च पुर्ण विहीर काढण्यासाठी झाला असल्यानचे पठाण कुटूंबीय सांगत अाहेत.घरापासून अोढा जवळ असल्याने १८ फूटांवर पाणी लागले.हे पाणी टिकून राहावे यासाठी त्यांनी अाणखी ५ फूट खोल व ७ फूट रुंद अशी विहीर पठाण कुटूंबीयांनी फक्त १५ ते १६ दिवसात पुर्ण केली. सा विहीरीमध्ये सध्या जवळपास चार फूट पाणी अाहे. विहीरीतील थंडगार पाणी पाहून भर उन्हात केलेल्या कष्टाचे फळ मिळालेच,पण अायुष्यभराचा पाण्याचा प्रश्नही मिटल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.