कराड शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांची कडक कारवाई
नवचैतन्य टाईम्स कराड तालुका प्रतिनिधी(अजीम सय्यद)-आज सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करत विनाकारण रस्त्यावर इतरत्र फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली आणि वाहने जप्त केली त्यामुळे बिनकामी बाहेर पडलेल्या व्यक्तीमध्ये घबराटीचे वातावरण होते.आणि त्यांना कारवाईस सामोरे जावे लागत होते.शहरातील
मुख्य रस्त्यावर विशेषता कृष्णा नाका,पांढरीचा मारुती परिसर,भेदा चौक, विजय दिवस चौक, कोल्हापूर नाका,कॅनॉल परिसर या ठिकाणी पोलीस प्रशासन रस्तावरील विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करताना दिसत आहे