पाचवड येथे सामाजिक बांधिलकीतून कोविड रुग्णांना वाफ घेण्याचे मशीन व फळे वाटप
नवचैतन्य टाईम्स कुडाळ पाचवड प्रतिनिधी(आसिफ मणेर)-वाई तालुक्यातील पाचवड येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव व ग्रामपंचायत सदस्य सौ.हेमलता जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड रुग्णांना वाफ घेण्याची मशीन व फळांचे वाटप केले.पाचवड आरोग्य उपकेंद्र व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील कोरोना रुग्णांचा विलगीकरण कक्ष या ठिकाणी जाऊन त्यांनी ते सहकार्य केले. कोरोनाविषाणू च्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लाॅकडाऊन आहे. या कठीण काळात अनेक जण पुढे येऊन वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करीत आहेत. या मध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.अशा वेळी पाचवड येथील सामाजिक कार्यकरते रवींद्र जाधव व ग्रामपंचायत सदस्या हेमलता जाधव यांनी कोविड रुग्णांना वाफ देण्याचे मशीन व फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समाजात सहकार्याचा संदेश दिला आहे.यावेळी वाई पंचायत समितीच्या सभापती सौ संगीता चव्हाण, नवलाई पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, संचालक अशोकराव गायकवाड,अनिल शेवाळे,मोहन चव्हाण,कमलाकर गायकवाड, दिनेश मोरे, दत्ताशेठ बांदल, ग्राम विकास अधिकारी बाळासाहेब चव्हाण, भुईंज आरोग्य केंद्राचे सचिन सोनवणे उपस्थित होते.