बोडारवाडी धरणास लवकरात लवकर मान्यता मिळावी या करीता जलसंपदामंत्री मा.जयंतराव पाटील यांना निवेदन सादर

नवचैतन्य टाईम्स मेढा प्रतिनिधी(अनिकेत पवार)बोडारवाडी धरणास लवकरात लवकर मान्यता मिळणे बाबत साताऱ्या जिल्हा जावळी तालुका मधील बोंण्डारवाडी धरण होणे अत्यंत गरजेचे असून धरणाचे पाणी हे फक्त पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी मिळून त्यात कृती समिती ने ज्याठिकाणी धरण रेषा ठरवली आहे त्याच ठिकाणी धरण व्हावे ही जावळी मधील 54 गावाचा निर्णय असून तो जिव्हाळ्याचा विषय आहे. तसेच 54 गावातील पाण्याचाही प्रश्न मिटेल व जावळीतील 54 गावांमध्ये बागायत शेती ही होईल.तो लवकरात लवकर मार्गी लावावा असे निवेदन दिले आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिष दादा कदम यांनी महाराष्ट्र राज्य चे जलसंपदामंत्री आदरणीय मा. श्री.जयंत पाटील साहेब यांची भेट घेतली या वेळी मंत्री महोदय बोलत होते. पूर्ण धरणाविषय पाठपुरावा करून लवकरच मीटिंग लावून बोंण्डारवाडी धरण प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!