सहज निर्मल रचना

आठवतो चित्ती,आई तुझे पाय!
सलील हृदय!होय तेने!!१!!
अंतरी पसरे,सखोल शांतता!
विझुनिया जाता!दिपु जैसा!!२!!
पापणी मिटता,मनगोळा होय!
वेडाऊन जाय!उर्ध्व पंंथे!! ३!!
तेथे मज वाटे,शांती, समाधान!
भोगतो चैतन्य!राणीव ते !!४!!
दासशंभु म्हणे,आनंद सोहळा!
सहस्त्र कमळा!दाटू लागे !!५!!
———————————————–
आईने सांगितलेला सहज हा विश्वातील परमेश्वर प्राप्तीचा एकमेव एक नंबरचा सुलभ असा मार्ग आहे.या मार्गावर चालणारे असंख्य सहजींचे
समुह दिशा व साधने यांचा सुव्य व स्थित वापर न करता आल्यामुळे ते सहज सुवर्णमय तेजस्वी पर्वत शिखराच्या पायथ्याशीच संभ्रमित होऊन भटकत आहेत.त्यांना तेथेच बरे वाटते.ती संख्या पन्नास टक्के आहे. त्यातील पन्नास टक्के वेळीच सावध होऊन पायथ्या पासून वरचढण्यासाठी धडपडत आहेत.हा सर्व जथा तील तीस टक्के सहजी विशेष अंतर्मुख होतात.ते आणखी सुवर्णमय तिसरे शिखर चढु लागतात.राहिलेले लोक सहजाच्या दुसऱ्या प्रवेश द्वारावरच नव निर्माण करण्यात,योजना आखण्यात गुंतुन पडलेले असतात.त्यातील दहा टक्के सहजी विशेष तयारीने,ध्यान धारणा व दिव्य आचरणामुळे,व सतत चक्रे स्वच्छ केल्यामुळे,मधील दोन आयाम ओलांडून आज्ञेच्या कक्षेत प्रवेश करतात.आता येथुन खऱ्या, निरागस, पवित्र,बालिश,व अहंकार रहित लोकांची एकूण बारा रुद्र तपासणी करतात.हाच खरा स्वर्ग आहे.येथे येशु भगवान साधकांना स्वर्गात घेण्यासाठी तत्पर असतात.परंतु दहा टक्के लोक आज्ञेच्या उभ्या दंडुक्यात अडकलेले असतात.कारण ते आठवणींच्या गतकाळात रमतात.हातुन झालेल्या चुकांचे स्मरण होते.पण ते निरागस न झाल्याने ते आहे त्याच जागेवर स्वर्ग मानुन राहतात.रुद्र त्यांना तेथुन पहिल्या आयामाकडे ढकलतातशेवटी दहा टक्के लोक शेवट पर्यंत जातात.श्री माताजी म्हणतात, कुंडलिनी जागृत होऊन सहस्त्रारातुन बाहेर पडल्यावर सर्वव्यापी परमेश्वरी शक्ती मध्ये मिसळते व ती शक्ती तुमच्या मधुन वाहु लागते.आपलीनिर्मिती पाच तत्वातुंन झाली आहे.परमेश्वर शक्ती तुमच्यामध्ये प्रवाहीत झाल्या नंतर ती सुक्ष्म पाच तत्वांमध्ये विभागीत होऊ लागते. शास्त्रामध्ये सांगितले आहे की परमात्म्याचे प्रगटीकरण होताना प्रथम नाद निर्माण झाला.दासशंभु सहजींना विनंती करतो आहे की,आईच्या दिव्य चरणा तुन हा दिव्य ध्वनी कानात व हृदयात उमटतो.त्या दिव्य ध्वनींने मनाची असामान्य एकाग्रता वाढीस लागते.
—-दासशंभु म्हणे—-

error: Content is protected !!