टोकीयो ऑलिंम्पिक 2020 स्पर्धेत निवड झालेल्या प्रविण जाधव यांच्या पालकांचे सातारा जिल्हाधिकाऱ्यानी केले अभिनंदन

नवचैतन्य टाईम्स कुडाळ पाचवड प्रतिनिधी(आसिफ मणेर)-सातारा दि. 14 : टोकीयो ऑलिंम्पिक 2020 करिता धनुर्विद्या खेळाच्या भारतीय संघामध्ये सातारा जिल्ह्यातील मौजे सरडे,ता.फलटण येथील प्रविण रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपल्या अथक परिश्रमामुळे व प्रोत्साहनामुळेच प्रविण जाधव यांनी उच्चतम कामगिरी करुन जिल्ह्याचा गौरव संपूर्ण भारत देशामध्ये वाढविला असून त्यांच्या अडीअडचणीबाबत चर्चा केली व संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.टोकीयो ऑलिंम्पिक 2020 करिता निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सेल्फी पाँईटचे उद्घाटन प्रविण जाधव यांचे पालक व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक,अध्यक्ष सातारा जिल्हा आर्चरी असो.आबासाहेब जाधव, सचिव सातारा जिल्हा आर्चरी असो.चंद्रकांत भिसे, शिक्षक विकास भुजबळ, मोहन पवार व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!