कृष्णामाई स्वच्छता अभियान पालिके बरोबर नागरिकांचेही कर्तव्य

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी (अमोल मांढरे)निसर्गाने नेहमीच मानवाला भरभरून दिले आहे. तेव्हा आपल्याला जो पर्यावरणाचा समृद्ध वारसा आहे तोच आपणास जोपासणे गरजेचे आहे. तेव्हा आजपासून आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाचे प्रश्न सोडूया व पर्यावरणाचे नवनवीन उपक्रम हाती घेऊन आपले कर्तव्य पार पाडू या. नमस्कार मी अमोल मांढरे वाई. वाई हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. अनेक सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय क्षेत्राबरोबरच पर्यावरणाचा ही समृद्ध वारसा आमच्या वाई नगरीला लाभलेला आहे. याचा सर्वान बरोबरच आम्हा वाईकर नागरिकांनाही सार्थ अभिमानच आहे. संथ वाहते कृष्णामाई हे बोधवाक्य ऐकून सर्व लहान थोरांना सुखद अनुभव येतो. आमच्या कृष्णा नदीला शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा आहे. या नदीने सर्वांनाच नेहमी भरभरून दिले आहे. प्रतापगडावरचा शौर्य दिन याचा आपल्या इतिहासात सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा दिवस अशा या आमच्या वाई नगरी ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन केले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श स्वराज्य निर्माण केले त्याचा सर्व जगासमोर एक आदर्श आहे.तेव्हा आज पर्यावरण रक्षणासाठी आपण एक संकल्प करूया..
चला कृष्णमाई स्वच्छता अभियान राबवू या या मोहिमेचे सर्व नागरिकांनी स्वागत केले आहे. यामध्ये सर्व स्तरातील लोकांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे. आपली कृष्णामाई ही वाई तीर्थक्षेत्रांमध्ये पर्यटकांचे पूर्वीपासूनच एक महत्त्वाचे आकर्षणाचे स्थान राहिले आहे. याचा आपल्या सर्व वाई करांना सार्थ अभिमानच आहे. परंतु मधील काळामध्ये कृष्णा पात्रामध्ये मध्ये घाणीचे, जलपर्णीचे आणि प्रदूषित पाणी यांचे साम्राज्य दिसून आले. ही निश्चितच गंभीर बाब आहे. पालिकेलाही हा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे पालिकेने एक पाऊल पुढे टाकून कृष्णमाई स्वच्छता अभियान हा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याला समाजातील सर्व स्थरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु ही केवळ पालिकेची जबाबदारी नसून सर्व वाईकर नागरिकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. यासाठी सर्व नागरिकांनी पुढे येऊन काही बंधने पाळणे आवश्यक आहे. यामध्ये नदी पात्राची स्वच्छता राखणे, यामध्ये घाण, कचरा , निर्माल्य न टाकने इत्यादी बाबींचा समावेश आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे न राहता सर्वांनी हा उपक्रम पूर्णत्वास नेणे ही गरज आहे. विशेषतः लोकप्रतिनिधी ,युवक वर्ग ,विद्यार्थी ,सामाजिक संस्था या सर्वांनी एकत्र येऊन आणि सुसंवाद करून सूत्रबद्ध पद्धतीने या उपक्रमाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेषतः युवक वर्गाने पुढे येऊन स्वच्छतेचे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे. शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना प्रेरित करून त्यांनाही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणे ही फायदेशीर गोष्ट आहे. विशेषतः लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि वरिष्ठ पातळीवर या उपक्रमाची चर्चा करून शासनाकडून या उपक्रमासाठी निधी मिळवणे आवश्यक आहे. तेव्हा वाई तीर्थ क्षेत्रातील आपण सर्व नागरिकांनी पक्षीय व वैचारिक मतभेद बाजूला ठेवून श्री महागणपतीच्या आशीर्वादाने हा उपक्रम पूर्णत्वास नेऊ हीच सदिच्छा. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे वाई.
Mobile.7709246740.

error: Content is protected !!