महाराष्ट्र राज्यातील विशेष घडामोडी

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(शेखर तलाठी)
गांधी- टिळकांचा आवाज दाबण्यासाठी इंग्रजांनी जो कायदा लागू केला त्याची आज काय गरज?
• देशद्रोह कायद्याच्या दुरुपयोगावरून सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल.

दहावीचा आज ऑनलाइन निकाल.. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती.

जगभरात कोरोनाची तिसरी लाट सुरू; ‘हू’चा इशारा.

पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सह. साखर कारखान्याचे बँक खाते जप्त.. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची थकबाकी वसूल.

ड्रोन वापरासाठी नियमावली थोडी कडक, थोडी सूटही..जम्मू विमानतळावरील हल्ल्यानंतर नव्या ड्रोन नियमांचा मसुदा जाहीर.

एमपीएससीच्या ८१७ पदांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा..उपमुख्यमंत्री पवारांनी काढला तांत्रिक अडचणींतून मार्ग.

.अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करणार..खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्राद्वारे इशारा.

कोरोनाच्या कारणांमुळे रेल्वेच्या ५३ प्रकारच्या प्रवास सवलती बंदच.

मान्सून विदर्भातून उत्तरेकडे सरकणार; राज्यातील पावसाचा जोर ओसरणार.

राज्यातील २८ जिल्ह्यांतील ५ हजार ९४७ शाळा सुरू..पहिल्या दिवशी ४ लाख १६ हजार ५९९ विद्यार्थी उपस्थित.

error: Content is protected !!