आंबेघर मधील दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना सातारा मुस्लिम जमात कडून तात्पुरते पुनर्वसन पूर्ण किटचे भेट
नवचैतन्य टाईम्स कराड तालुका प्रतिनिधी(अजीम सय्यद)आंबेघर मधील दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना सातारा मुस्लिम जमात कडून तात्पुरते पुनर्वसन पूर्ण किट भेट देत दुःखात सामील होण्याचा प्रयत्न माणुसकीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या साताऱ्यातील मुस्लिम शहर समाजा वतीने कार्यरत असणाऱ्या खिदमत ए खल्क कमिटीने मोरणा भागातील अपत्तीग्रस्त व दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या गरजा जाणून ज्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे त्यांच्या दुःखात सामील होत तात्पुरत्या पुनर्वसनाचे किट भेट दिले .आंबेघर येथील 9 कुटुंबांच्या सर्व सदस्यांना अंतर्वस्त्रे ,पुरुषांना टी शर्टस ,पॅन्ट ,महिलांना गाऊन ,साड्या, बालकांना पॅन्ट शर्ट, ड्रेस ,हिवाळी गरम स्वेटर जरकिंग्ज ,अंथरून ,पांघरून ,टॉवेल , कुटूंबाला 15 दिवस पुरेल एवढे राशन , मेणबत्ती , आणि गरजेचे भांडी भेट दिली. माणुसकीच्या नात्याने संकटात सापडलेल्याना हाथ देणे हे असलेले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला असून तुम्ही एकटे नाही आम्ही सर्व तुमच्या कुटुंबातील सदस्य आहोत निःसंकोचपणे काहीही जबाबदारी असल्यास पार पाडू असे आवाहन खिदमत ए खल्क च्या वतीने साजिद शेख यांनी दिले.माणुसकीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या साताऱ्यातील मुस्लिम शहर समाजावतीने कार्यरत असणाऱ्या खिदमत ए खल्क कमिटीने दोन दिवस पाटण तालुक्यातील मोरणा भागातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांच्या भेटी घेऊन दोन दिवस पूर्ण भोजनाची व्यवस्था करित तेथील परिस्थितीचा व गरजांचा आढावा घेतला .मोरणा ,धावडे व गुरेघर शाळेमध्ये स्थलांतरित केलेल्या कुटुंबियांच्या पूर्ण भोजनाची व्यवस्था करित त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला .आंबेघर कुटुंबीय नातेवाईकांचे सावडण्याचे कार्य करून दि 26 रोजी दुपारी येणार असल्याने त्यांचे पूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे त्यामुळे त्यांच्या दुःखात सामील होत सर्वप्रथम आधार देण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे आंबेघर गावातील 9 कुटुंबियांना गरजेच्या पूर्ण वस्तू भेट देत तुम्ही एकटे नसून आम्ही ही तुमच्या कुटुंबियांचेच सदस्य असल्याची जाणीव करून दिली.आंबेघरच्या बाधित कुटुंबियांना भेट देत कुटुंबियांची झालेली वाताहत व उध्वस्त झालेल्या कुटुंबियांची हकीकत ऐकत असताना खिदमत ए खल्क च्या सर्व सदस्यांचे डोळे भरून आले होते.
मोरणा भागातील आपतिग्रस्तांना साथ देण्यासाठी सातारा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने खिदमत ए खल्क ने केलेल्या प्रयत्नांची व भेट वस्तूंची आठवण मोरणा विभाग कधीही विसरू शकणार नाही तसेच सर्व स्वंय सेवकांचे मोरणा भाग ऋणी असून ही मोलाची व योग्य वेळी दिलेली साथ नेहमी स्मरणात राहील अशा शब्दात संदीप कोळेकर यांनी ऋण व्यक्त केलं.बाधित कुटुंबातील मुलांची शिक्षणाची जबाबदारी खिदमत ए खल्क ने स्वीकारली आंबेघर गावातील आपत्ती मुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबियांना गरजेच्या भेट वस्तू दिल्यानंतर ज्या 9 कुटुंबियातील व्यक्तीचा मृत्यू भुसखलनामुळे झाला आहे त्या कुटुंबातील सर्व मुलांच्या शिक्षणाचा खर्च खिदमत ए खल्क कमिटी पै नजीर अब्बास खान स्कॉलरशिपच्या माध्यमातून करणार असल्याचे सादिकभाई शेख यांनी जाहीर केले .
सातारा शहर मुस्लिम समाजाच्या वतीने खिदमत ए खल्क माध्यमातून दोन दिवस केलेले कार्य उल्लेखनीय असून माणुसकीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या व नेहमीच झटणाऱ्या खिदमत खल्कचे आभार शब्दात व्यक्त न होणारे आहे असे वक्तव्य करत चपाती ,कुरमा ,व्हेज पुलाव बनविणाऱ्या दस्तगिर नगर मधील महिला भगिनींचे व खिदमत ए खल्क च्या सर्व सदस्यांचे आभार माजी जि प सदस्य बशीर खोंदू यांनी मानले.
सातारा शहर मुस्लिम जमात च्या वतीनेअमीर सहाब अनिसभाई तांबोळी यांच्या सूचनेनुसार खिदमत ए खल्क च्या हाजी मोहसीन बागवान , मुबिन महाडवाले हाजी सलीम यांच्या मार्गदर्शनानुसार आरिफ खान असिफ फरास ,इम्रान सुमो,पिंटूशेठ सुतार सलीम पाळणेवाले ,अज्जूभाई घड्याळवाले ,तौसिफ बागवान ,हाफिज मुराद ,मोहसीन ,जावेद बागवान समीर मोबाईल ,सलमान भाईजि असिफ खान व इतर बांधवानी परिश्रम घेतले .