इंदापुरात पहाटेच्या वेळी डिझेल चोरांच्या पाठलागाचा थरार! पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

नवचैतन्य टाईम्स इंदापूर तालुका प्रतिनिधी(जावेद मणेरी)-बुधवारी पहाटे वेळ तीनची..एक ट्रक डिझेल चोरून निघालेला आहे अशी माहिती मिळते. पोलिस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात. पोलीस आडवे येताच पोलिसांच्याच अंगावर घालण्याचा प्रयत्न चालक करतो आणि तिथून सुरु होतो एक जिवघेणा पाठलागाचा थरार..! जीवावर उदार होत पोलीस पाठलाग करतात आणि 40 किलोमीटरच्या अंतरावर हा पाठलाग संपतो आणि ट्रक ताब्यात येतो. मात्र तोपर्यंत दुर्दैवानं त्या ट्रक मधील संशयित आरोपी मात्र पळून पसार झालेले असतात!डिझेलची चोरी करुन भरधाव निघालेल्या ट्रकचा इंदापूर पोलिसांनी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास पाठलाग केला.पोलिसांनी तो ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र ट्रक चालकाने समोर पोलीस असल्याचे दिसताच तो ट्रक न थांबवतापोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला,पोलीसांनी पुन्हा या ट्रकचा पाठलाग सुरु केला.दरम्यान ट्रक मध्ये ठेवलेले चोरीचे डिझेलचे कॅन्ड पोलीसांच्या दिशेने भिरकावले गेले. दरम्यान ट्रक चालकाने भिगवण जवळील रेल्वचे फाटक तोडुन ट्रक पुढे नेला,पोलिसांनी मात्र ट्रक पकडायचाच असा निश्चय करत पाठलाग चालूच ठेवला.अखेर ट्रक चालकांनी इंदापूर पोलिसांना घाबरुन राशीन रस्त्यावर तो ट्रक सोडून रात्रीचा अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.मात्र इंदापूर पोलिसांनी धाडसाने ट्रक सह डिझेलचे कॅन असा 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी पकडलाच.इंदापूर पोलीसांनी रात्रगस्त करीत असतानाचे दरम्यान चोरी केलेल्या डिझेल सह ट्रक वर कारवाई केली. ही कारवाई आज बुधवार( दि.11 ) रोजी रात्रगस्त करीत असताना पहाटेच्या सुमारास करण्यात आली.या कारवाईत एका ट्रकमध्ये एक हिरव्या रंगाचा डिझेल काढण्यासाठीचा पाईप, 35 लिटर मापाचे चोरीचे डिझेलचे 8 निळ्या रंगाचे कॅन्ड व 25 निळ्या रंगाचे रिकामे कॅन्ड व ताब्यात घेतलेला ट्रक असा एकूण 10 लाख 28 हजार 850 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.इंदापूर पोलीसांनी विठ्ठल धोंडीराम नलवडे (वय 28 वर्षे) यांच्या फिर्यादीवरुन भा.द.वि.कलम 307,353,379,34 , सह रेल्वे अधिनियम 1989 चे कलम 151,153, 154,160 व सार्वजनीक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम सन 1984 चे कलम 3 मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार ट्रक नंबर MP-09-HF-8746 चालक त्याचा साथीदार यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची अधिक माहिती अशी,की बुधवारी रात्री चालक विठ्ठल नलवडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे हे इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रगस्त करीत होते. रात्री तीन वाजताचे दरम्यान पोलीस ठाणे अंमलदार पोलीस नाईक अमीत चव्हाण यांनी फोनद्वारे एक 10 टायर ट्रक डिझेल चोरी करुन पुण्याकडे निघाला आहे याची खबर दिली.त्यानंतर स.पो.निरीक्षक धनवे यांनी सरकारी वाहनातून सदर ट्रकचा शोध सुरु केला.याच दरम्यान लोणी एम आय डी सी चौकातुन एक ट्रक भरधाव वेगाने पुण्याकडे जाताना दिसून आला.पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला.
काही अंतर पुढे गेल्यावर डाळज गावाजवळ पोलीसांनी सदर संशयीत ट्रक ला ओव्हरटेक करून पुढे जावुन ट्रकला थांबविणयाचा इशारा केला असता त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, ट्रक नंबर एम.पी.09 एच.एफ. 8746 वरिल चालक व त्याच्या साथीदाराने त्यांचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवुन पोलीस कर्मचारी विठ्ठल धोंडीराम नलवडे यांच्या अंगावर घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर पोलीसांनी या ट्रकचा पाठलाग सुरु केला. दरम्यान ट्रक मध्ये ठेवलेले चोरीचे डिझेलचे कॅन्ड पोलीसांच्या दिशेने भिरकावुन शासकिय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काही डिझेल रस्त्यावर सांडुन सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान केले आहे.दरम्यान ट्रक चालकाने रेल्वेचे फाटक तोडुन रेल्वचे मालमत्तेचे नुकसान करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.राशिन रोडला लागल्यानंतर सदरील ट्रक चालक व त्याचा साधादार यांनी त्याचे ताब्यातील ट्रक रस्त्यावर सोडून ते फरार झाले. गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे करीत आहेत .

error: Content is protected !!