महाबळेश्वर मधील सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ अखेर घाट बंद असल्याचा सुचना फलक लावण्यात आले आय एच आर ए व नवचैतन्य टाईम्सच्या पाठपुराव्याला यश !
नवचैतन्य टाईम्स महाबळेश्वर प्रतिनिधी(बाजीराव उंबरकर)-गेल्या महिन्यापासून गाढ झोपेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आय एच आर ए व नवचैतन्य टाईम्स च्या बातमीने खडबडून जाग आल्याने अंबेनळी घाट वाहतुकीस बंद असल्याचे सूचनाफलक महाबळेश्वर एस टी स्टॅन्ड महाड नाका मेटतळे या तिन तिन ठिकाणी अखेर लावण्यात आले.मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अंबेनळीघाटात मोठ्यप्रमाणावर नुकसान झाले कारणाने हा घाटमार्ग वहातूकीस पुर्णपणे बंद आहे.या संबंधीचे सूचनाफलक हे संबंधित विभागाकडून लावण्याचे गरजेचे असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे अजिबात गांभीर्य नव्हते त्याचा नाहक त्रास वाहन चालकांना सोसावा लागत होता.दाट दुख्यातून प्रवास करताना अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नव्हती संबंधित बाब ही आय एच आर ए व नवचैतन्य टाईम्सच्या बातमीत दाखवण्यात येताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली असून एका एका परिसरात तिन तिन दोन दोन सूचनाफलक लावण्यात आले.उशीरा का होईना पण आपल्या कर्तव्याची जाणीव झाली.हे सामान्य जनतेचे व वाहन चालकांचे नशीबच म्हणावे लागेल.या बातमीमुळे वाहन चालकांची होणारी गैरसोय कमी झाल्याने आय एच आर ए व नवचैतन्य टाईम्स विषयी कृतज्ञता व्यक्त होत आहे.