नांदेड जिल्हा भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी जाहीर
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(मकसुद शेख)सातारा,दि.२८: भारतीय मराठा महासंघाची शिवबानगर देगलूर जि.नांदेड येथे आढावा बैठक प्रदेश उपाध्यक्ष जयदीप दादा वरखिंडे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न होवून जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पवार होटाळकर व जिल्हा सरचिटणीस शिवाजी जाधव सातेगावकर यांनी विविध पदाधिकारी यांची नियुक्ती जाहीर केली. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा देगलूर काॅग्रेसचे अध्यक्ष जनार्दन बिरादार,शिवबानगर चे नगरसेवक नितेश पाटील भोकसखेडकर, राष्ट्रवादी युवा चे शिवकुमार डाकोरे, चंद्रकांत (नाना) मोरे, भारतीय मराठा महासंघ नायगाव चे परमेश्वर जाधव,उपाध्यक्ष देवीदास वडजे, देगलूर तालुका उपाध्यक्ष बालाजी पांचारे, पत्रकार मिलिंद वाघमारे, चंद्रकांत गज्जलवाड उपस्थित होते.जयदीप वरखिंडे म्हणाले कि भारतीय मराठा महासंघ मागील २० वर्षापासून स्वतंत्रपणे वाटचाल करित आहे. आज देगलूर व जिल्हातील विविध कार्यकर्ते जोडले गेले असून देगलूर तालुक्यात व जिल्हामध्ये संघटना चांगले कार्य उभे करील. तसेच, तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुट होवून शेतकऱ्यांचे प्रश्न तहसिल, बॅक, कर्ज,युवा याच्या प्रश्नासाठी व विकासात्मक कामासाठी पूढे होवून कार्य करावे असे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार होटाळकर यांनी सांगतच आपल्या सोबत भारतीय मराठा महासंघ असेल असेही ते म्हणाले. नायगाव चे तालुका उपाध्यक्ष देवीदास पाटील वडजे यांनी विविध प्रश्नाची उकल करून माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना मोरे यांनी केले.नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे – देगलूर तालुका अध्यक्ष ईश्वर देशमुख, नांदेड जिल्हा सोशल मिडिया प्रमुख पदी निळकंठ जाधव, नांदेड जिल्हा सह सचिव पदी अम्रत पाटील, देगलूर तालुका सचिव पदी बाबाराव कदम तडखेलकर, नरसिंग पाटील गवंडगावकर, करडखेड सर्कल प्रमुख पदी गोरखनाथ कदम, सह सर्कल प्रमुख औदुंबर कदम, ढोसणी शाखा अध्यक्ष पदी साईनाथ पाटील, भायेगाव शा. सचिव नरसिंग कदम, सचिव दत्ता कदम तर सदस्य पदी दिगंबर डोंगळे यांना पदनियुक्ती देण्यात आली. यावेळी भक्तापूर शाखा अध्यक्ष मोहन भायेगावे, भायेगाव शाखा अध्यक्ष दिगंबर कदम, बालाजी अगदे यांसह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.