नांदेड जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा-चंद्रकांत पाटील (पवार)होटाळकर

नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(मकसूद शेख)सातारा, दि.८ : काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पाऊसाने थैमान घातले असुन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या लहरी पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस असल्यामुळे व ६ व ७ तारखेच्या मध्यरात्री मोठा पाऊस झाल्यामुळे तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांस हेक्टरी 80 हजार रुपये दुष्काळ अनुदान द्या अशी मागणी चंद्रकांत पाटील (पवार) होटाळकर भारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी प्रशासनास केली आहे.पावसामुळे शेतकऱ्यांचे उडीत,सोयाबीन,कापुस, तुर व ज्वारीसह इतर अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच, या पावसामुळे उडिद सोयाबीन भिजुन त्याला कोंब फुटत आहेत अशातच अनेक शेतकऱ्यांचे उडीद कापुन गोळा करून ढिग ठेवले होते त्याच्या खालुन पाऊसाचे पाणी जाऊन त्यांचे पण मोठं नुकसान झाले आहे.सतत दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे विमा उतरवित आहे जेणेकरून अशा लहरी संकटामुळे त्यांना पिक विमा मिळुन मदत होईल या आशेने विमा भरत आहेत परंतु पिक विम्याच्या जाचक‌ अटीमुळे तीन ते चार वर्षांपासून नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना विमा मिळत नसुन या विषयावर कोणतेही खासदार व आमदार आवाज उठवायला तयार नाही. त्यामुळे किमान यावर्षी तरी पिक विमा मिळेल अश्या आशा पोटी शेतकरी जगत आहेत. महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब व नांदेड जिल्हाचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोकराव चव्हाण यांनी पिकविमा कंपनीला आगाऊ २५% रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची सुचनाही केली.परंतु यावर्षी शेतकऱ्यांचे खुपचं जास्त नुकसान असल्यामुळे त्यांना भरीव पिक विमा मिळवून देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करावे हि पण मागणी केली आहे. अनेक गावातील नदी नाले या अतिवृष्टीच्या पाऊसामुळे भरुन वाहत असुन नदी नाले काठच्या जमिनीत पाणी घुसून जमिनी खरडुन‌ वाहुन गेली आहे. अशा अस्मानी संकटाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन त्यांना मदत केली पाहिजे अशीही मागणी चंद्रकांत पाटील (पवार) यांनी केली आहे.

error: Content is protected !!