कुडाळामध्ये बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्याकडून गणेश मंडळाची पाहणी

नवचैतन्य टाईम्स कुडाळ प्रतिनिधी(मंगेश भोसले)कुडाळ येथे सातारा पोलीस दल व पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्या नेतृत्वाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्या कडून विविध गणेश मंडळाची पाहणी करण्यात आली.गणपती म्हणलं की सर्वीकडे माणसांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. ठिक-ठिकाणी माणसांची वर्दळ वाढत असते.
त्यामुळे जो-तो देवदर्शनासाठी बाप्पाच्या चरणी लीन होत असतो.
“श्री”चे देवदर्शन करत असताना अनेक भक्तांकडून हार,नारळ,फुले, ई. साहित्य अर्पण केले जाते.त्यामुळे एक शंका म्हणून घातपात घडण्याची संभवता नाकारता येत नाही. तसेच कोणताही अनुचित प्रकार गणेश मंडळे व त्या-जवळच्या परिसरामध्ये घडू नये,यासाठी सातारा पोलीस दलामार्फत व पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल यांच्या नेतृत्वाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथक यानकडून विविध जावली तालुक्यातील गणेश मंडळाची पाहणी करण्यात आली आहे.यावेळस मंडळाचा आतील व बाहेरील सर्व परिसर पथकाद्वारे तपासण्यात आला.या पथकामध्ये प्रामुख्याने श्वान रुद्रा,पोलीस उपनिरीक्षक शशिकांत घाडगे,पोलीस नाईक अक्रम मेटकरी,पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव,अमोल निकम, विजय निकम,कुडाळ पोलिस व विविध मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!