वसई -विरारच्या कार्यसम्राट रेणुका जाधव यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(दिनेश लोंढे)मुबंई,दि.१२ – वसई – विरारच्या कार्यसम्राट रेणुका जाधव यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस भाजप तसेच सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी यांचा देखील समावेश आहे.
अनेकांनी त्यांना समक्ष भेटुन तसेच फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्या तरि सध्या देशावर येत असलेल्या एकामागोमाग अनेक सकंटाचा सामाना जनतेला करावा लागत आहे मग तो कोरोणासारखी महामारी असो किंवा अतिवृष्टीचा सामना राज्यातील जनता करत आहे. देशावर निसर्ग कोपला असून कोरोणा व्हायरसमुळे आणि अतिवृष्टीच्या पुरामुळे अनेक मृत्यु झाले आहेत अनेकांच्या कुटुंबावर आघात झालाआहे. संपुर्ण देश शोकाकुल असून कोणिही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन रेणुका जाधव यांनी केले आहे.रेणुका जाधव यांचा हा ३२ वाढदिवस असून त्यानी कोरोणा काळात अनेक रूग्णांची सेवा तसेच अतिवृष्टी झालेल्या भागात पूरग्रस्तांना देखिल मदत केली. अन्याय पिडित लोकांना न्याय देण्यासाठी ते स्वतःला झोकून काम करतात त्यात त्यांचा कसलाही स्वार्थ नसतो. त्यानी सर्व शुभचिंतकाना आव्हान केले आहे की वाढदिवसानिमित्त कसलेही पोस्टर फलक लावू नयेत किंवा कोणिही अभिष्टचिंतन करण्यासाठी भेटू नये. सर्वांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर असुन आपण या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी शासनाने केलेल्या नियमाचे आपण सर्वांनी काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे आवाहन रेणुका जाधव यांनी केले आहे.

error: Content is protected !!