शाळा सुरू करणे बाबत त्रिसूत्री कार्यक्रम राबवावा

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी (अमोल मांढरे)सध्या सर्वत्र लॉक डाऊन संदर्भात चर्चासत्र, टीव्हीवरील बातम्या, विविध वृत्तपत्रे आणि त्याच बरोबर सोशल मीडियावर याबाबत आपण विविध प्रश्नांचा आलेख बघत आहोत. लॉक डाऊन मुळे निर्माण होत असलेल्या प्रश्नांमध्ये शाळा सुरू करणे बाबत हाही एक गंभीर व चर्चेचा विषय आहे.सध्या कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे, शासनाने अनेक निर्बंध घातलेले आहे. त्यामध्ये शाळा सुरु करणे बाबत अजून स्पष्ट निर्णय झालेला नाही. शासनाने पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केलेल्या आहेत. गेले दीड ते दोन वर्ष विद्यार्थी हे शाळेपासून दूरच राहिलेले आहेत. सध्या सर्वच विद्यार्थी घरी बसूनच मोबाईलवर ऑनलाइन अभ्यासक्रम शिकत आहे. परंतु शहरी भागाबरोबरच ग्रामीण विद्यार्थी ही याच माध्यमाद्वारे शिकत आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना याबाबत अनेक समस्या निर्माण होत आहेत. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे विद्यार्थी ही शाळेपासून दूर राहिल्यामुळे प्रत्यक्ष शाळेचा व शिक्षकांचा संबंध आता राहिला नाही. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक विकास हा होताना दिसत नाही. कारण विद्यार्थी हे शाळेच्या व शिक्षकांच्या संपर्कात राहूनच विविध गोष्टींचा आढावा घेत असतात व त्याद्वारे त्यांचा परिपूर्ण विकास होत असतो. सध्या सर्व महाविद्यालय लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला परंतु प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांचे बाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.त्यामुळे हा एक गंभीर विषय आहे.पूर्वीपासूनच आपल्या भारत देशाला गुरुकुलाची आदर्श परंपरा आहे.सध्या जागतिक स्तरावर जे शिक्षण दिले जाते त्याचा मूळचा पाया हाच भारतीय शिक्षण संस्थेने घातलेला आहे. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे.परंतु गुरु कुलामध्ये गुरु व शिष्य यांची एकमेकांत बाबतची संकल्पना ही विचारात घेणे अत्यावश्यकच आहे. अभ्यासाबरोबरच कला ,क्रीडा ,आरोग्य ,संस्कृती या क्षेत्रातील विविध पैलूंचा अभ्यास हा फक्त शाळेमध्येच होत असतो. परंतु सध्या हे होताना दिसत नाही.तेव्हा शाळा सुरु करणे बाबत अभ्यासपूर्ण व सूत्रबद्ध पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे.त्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम राबवणे योग्य ठरेल. यामध्ये शासन यंत्रणा शाळा व पालक या तिघांचाही एकमेकांशी सुसंवाद होऊन या प्रश्नांवर उपाय शोधता येणे गरजेचे आहे. शासनानेही थोडा धोका पत्करून विद्यार्थ्यांचे हितासाठीच शाळा लवकर सुरु करणे बाबत लवकर निर्णय घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन व पालक यांनी एकमेकांची जबाबदारी ओळखून व योग्य उपाययोजना करून लवकर शाळा सुरू करणे हे हिताचे ठरू शकते.शाळेने ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध योजना आखून व त्या प्रत्यक्ष राबवून तसेच पालकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हेही सर्व स्तरातील लोकांना विश्वास घेऊन व योग्य ते चर्चा करून चर्चा करून शाळा सुरू करणे बाबत योग्य ती पावले उचलत आहेत. तसेच त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यार्थ्यांना टॅब देऊन त्यांचा अभ्यास करून घेणे. ही संकल्पना मांडली होती. ही संकल्पना खरोखर स्वागतार्थ आहे. परंतु याचा फायदा सर्वत्र करून घेणे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्या चे गंभीर परिस्थिती मुळे सर्वांच्या प्रमाणात आर्थिक ताण पडलेला आहे. तेव्हा शाळेने ही विद्यार्थ्यांच्या फी मध्ये सवलत देऊन त्यांनाही शाळेकडे जोडून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच पालकांनीही या गोष्टीचा बाऊ न करता आपल्या विद्यार्थ्यांचे हितासाठीच त्यांना शाळेमध्ये जाणे योग्य ठरू शकते त्याचबरोबर आजचे आपले विद्यार्थी हेच उद्याच्या देशाचे आधारस्तंभ आहेत आणि शिक्षण म्हणजेच विद्यार्थ्यांच्या साठी एक वाघिणीचे दूधच आहे. जे विद्यार्थ्यांना भविष्यात उत्तम असे नक्कीच काहीतरी देऊन जाईल. .तेव्हा आपण सर्व पत्रकार बांधवांनी आपले कर्तव्य ओळखून शासन स्तरावर याबाबतची योग्य ती संकल्पना मांडणे गरजेचे आहे. तेव्हा शासन व्यवस्था ,शाळा व्यवस्थापन आणि पालक यांचा त्रिसूत्री कार्यक्रम राबवावा आणि नक्कीच योग्य तो मार्ग मिळेल यात तिळमात्र शंका नाही. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे वाई.
Mobile no.7709246740..

error: Content is protected !!