लॉकडाऊन मध्ये खास विद्यार्थ्यांशी हितगुज

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)आज आपल्या भारत देशाला कोरोना या महा संकटाने ग्रासले आहे. या संकटांचे परिणाम आपल्या बरोबरच सबंध जगाच्या अर्थकारणावर झालेला आहे. आपल्या समाजामध्ये सर्व स्तरातील नागरिक ,लहान थोरांपर्यंत सर्वांनी या संकटाची भीती घेतलेली आहे.हे सत्य नाकारता येणार नाही. व्यापारीवर्ग नोकरदार वर्ग,त्याचबरोबर कामगार वर्ग या सर्वांच्या जीवनात सखोल परिणाम दिसून येत आहेत.परंतु आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे विद्यार्थी वर्गाच्या शैक्षणिक क्षेत्रावर विशिष्ट बदल दिसून येत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनात असा बदल कधीही बघितलेला नसेल.पहिली ते बारावी पर्यंत ची परीक्षा शासनाने रद्द केलेली आहे. परंतु बारावीनंतर ची परीक्षा,वैद्यकीय,इंजीनियरिंग,वाणिज्य शाखा त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, व इतर सर्व परीक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. याची विद्यार्थ्यांबरोबरच शासनानेही गंभीर दखल घेतलेली आहे.यासाठीच विद्यार्थ्यांनी पुढे शासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.कारण सध्या शासन यंत्रणेवर बराच तान दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशासनात काही त्रुटी आढळून नक्कीच येतील, परंतु सर्व विद्यार्थ्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे.सध्या ग्रंथालयपेक्षा अथवा पुस्तके वाचण्यापेक्षा आजच्या विद्यार्थ्यांचा कल मोबाईल,इंटरनेट याकडे जास्त असल्याचा दिसून येत आहे.हा बदल आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे. परंतु आजच्या सोशल मीडियाचा वापर हा आपण मर्यादेपर्यंतच ठेवून स्वतःच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे लक्ष दिल्यास सकारात्मक बदल दिसून येतील.विद्यार्थ्यांनी इंटरनेट व युट्युब या माध्यमांद्वारे विविध महापुरुषांची आदर्श चरित्रे, आपल्या करियर साठी योग्य दिशा देणारे परिपूर्ण कोर्स, त्याच बरोबर नुसते शैक्षणिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता, कला, क्रीडा, आरोग्य ,संस्कृती, आणि देश हित अशा विविध क्षेत्रातील साहित्य व सखोल माहिती यांच्या करून स्वतःचा विकास करावा. आज विद्यार्थ्यांकडे बराच मोकळा वेळ आहे. तेव्हा त्यांनी रोजच्या विविध वर्तमानपत्रबरोबर, विविध दर्जेदार ग्रंथ काव्यसंग्रह, मासिके, त्याच बरोबर दर्जेदार मराठी चित्रपट व नाटक यांचा लाभ घ्यावा. आणि विशेष म्हणजे जरी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील हे वर्ष वाया गेले तरी जान है तो जहान है हे लक्षात ठेवून आपल्या भविष्याचे नियोजन करावे. त्याचबरोबर नियतीचा हा खेळ निराळा, भोगावे लागेल सर्व मानवजातीला .या काव्यपंक्ती तिचा अर्थ लक्षात घेऊन आणि श्री गणेशाच्या चरणी एकच मागणी ठेवून पुढील वर्षी नव्या उमेदीने आपले शैक्षणिक क्षेत्र जिंकून, आणि लॉक डाऊन च्या महा संकटाला हरवून आपल्या भारत देशाची विश्वगुरू ही ओळख जपून ठेवून पूर्ण विश्वास सहकार्य करावे. हीच सदिच्छा. धन्यवाद.
आपला कविराज अमोल मांढरे वाई.
Mobile.7709246740.

error: Content is protected !!