श्री गुरुचरित्र श्रीगुरु ब्रम्हस्वरूपी नृसिंह सरस्वती

नवचैतन्य टाईम्स डोंबिवली प्रतिनिधी(देविदास कोचले)१)गरीब श्रीमंत सर्व समानच.श्रद्धा व एकनिष्ठा हाच मापदंड श्रीगुरु ब्रम्हस्वरूपी एकदा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला असताना मठामध्ये सात भक्त त्यांना दिवाळी करीता निमंत्रित करण्यासाठी आले, महाराज भक्त वत्सल आहेत आणि आपले प्रेमळ बोलावणे नाकारणार नाहीत हि सर्व भक्त मंडळींना खात्री होती पण सर्व एकत्र आल्यानंतर आता गुरुमहाराज कोणा एका ठिकाणी जाऊ शकतील व ते ठिकाण आपले असावे या साठी त्या सात भक्तांमध्ये कलह सुरु झाला, प्रत्येकाची विनंती ऐकून मठातील भक्त मंडळी काळजीत पडली. ऐन दिवाळीच्या दिवशी गुरुमहाराज मठात नाहीत हि कल्पना त्यांना करवेना. आता गुरुमहाराज काय निर्णय घेतात याकडे सर्व पाहू लागले, यावर गुरुमहाराजांनी एकेका भक्ताला जवळ बोलावले व सांगितले मी तुझ्या घरी येत आहे आता समाधानी असावे मात्र हे वर्तमान गुप्त ठेवावे. यावर आनंदित होऊन ते सात भक्त आपापल्या घरी जाते झाले, तेव्हा मठात भक्तगण म्हणू लागले, महाराज आम्हाला सोडून जाऊ नये, दिवाळी आम्हासोबत साजरी करावी. यावर गुरुमहाराज म्हणाले मान्य आहे, मी इथेच असेंन. काही दिवसांनी दिवाळी नंतर ते सात भक्त पुन्हा योगायोगाने दर्शनाला आले व त्यांची भेट झाली, अर्थातच गुरुमहाराजांनी आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद दिले ते प्रत्येक जण सांगू लागला व त्याच्या पुष्ट्यर्थ आपण त्यांना दिलेली भेट मठात विराजमान असलेली दाखवू लागला, हा सगळा प्रकार पाहून मठामधील भक्तगण हस्तक्षेप करीत म्हणू लागले कि गुरुमहाराज इथे मठातच होते आणि आम्ही सर्व त्यांच्या सोबतच होतो, स्वपक्ष सिद्ध करताना कलह वाढू लागला तेव्हा गुरुमहाराज म्हणाले आता थोडं लक्ष द्या, मी सातही जागी गेलो होतो आणि इथेही होतो तेव्हा सर्वांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला व गुरुमहाराजांच्या अलौकिक लीलेबद्दल कौतुक व्यक्त करीत सर्व भक्त स्वस्थानी गेले.                                                     
*४) श्री गुरूंचा स्पर्श सहवास*

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संन्यासी होते अर्थात त्यांना इतरजनांचा स्पर्श त्याज्य होता. संपूर्ण गुरुचरित्रात केवळ एका जीवाचा स्पर्श नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजाना झाला. गंगा नावाची साठ वर्षे वयाची स्त्री महाराजांच्या आशीर्वादाने कन्यारत्न प्राप्त करून घेते आणि दहा दिवसांनी जेव्हा ती महाराजांच्या दर्शनाला येते तेव्हा आशीर्वादाकरिता त्या बालकाला महाराजांसमोर ठेवते. महाराज अत्यंत प्रेमाने त्या मुलीला उचलून कडेवर घेतात. कडिये घेतले प्रीतीसी ।। असे तेव्हाचे वर्णन गुरुचरित्रात आहे. आधीच अवतार काळात जन्म दुर्लभ, त्यातही तो अवतार ज्या प्रांतात आहे त्यात होणे, त्या अवताराशी संबंध येणे आणि अशी गुरुकृपा मिळणे एकाहून एक दुर्लभ आहे. त्या मुलीची अनंत जन्मांची पुण्याई फळाला आली आणि महाराजांचा सहवासप्राप्त झाला .

error: Content is protected !!