संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणें प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌴 *अध्याय २ रा*
🌸 *¦¦सांख्ययोग¦¦*
🌴 *ओवी ३६६ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌻विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः |निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति ||२-७१||*
अर्थ 👉  _जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून निरिच्छ, ममत्वरहित व अहंकाररहित होऊन संचार करतो, तोच शांतीला म्हणजेच स्थितप्रज्ञतेला प्राप्त होतो._
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌷ऐसा आत्मबोधें तोषला ।जो परमानंदें पोखला।तोचि स्थिरप्रज्ञु भला। वोळख तूं॥३६६॥*
     ह्याप्रमाणे जो आत्मज्ञानाने संतोष पावला, आणि परमानंदाने निमग्न झाला, तोच खरा स्थिर बुद्धी होय.
*🌷तो अहंकाराते दंडुनी । सकळ काम सांडोनि ।विचरे विश्व होऊनि । विश्वाचिमाजीं ॥३६७॥*
     तो आपले ठिकाणी असलेला मीपणा घालवून व सर्व विषय वासना टाकून सर्व जग ब्रह्मरूप समजून जगात संचार करतो.
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌻एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति |स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ||२-७२||*
अर्थ 👉 _अर्जुना, ही ब्रह्मविषयक अवस्था आहे. ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळी देखील या अवस्थेत स्थित होऊन तो ब्रह्मानंदाप्रत पोचतो._
➖➖➖➖🚩➖➖➖➖
*🌼ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे*
*श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम द्वितीयोऽध्यायः||२||*
*॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥*
🍀🌸🌼🍀🌸🌼🍀🌸
*🌷हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।पातलें परब्रह्म । अनायासें ॥३६८॥*
     जे निष्काम पुरुष अशा अमर्याद ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतात ते अनायासेच परब्रह्मास आत्मत्वाने प्राप्त  होतात. 
*🌷जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता । आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥३६९॥*
     कारण, त्या स्थितप्रज्ञाला देहाच्या अंतकाळी, मरण समयी होणारी व्याकुळता, तळमळ, चिंता ब्रह्मस्थितीमुळे स्थितप्रज्ञाच्या चित्तात प्रतिबंध करू शकत नाही. 
*🌷तेचि हे स्थिति ।स्वमुखें श्रीपति ।सांगत अर्जुनाप्रति।संजयो म्हणे॥३७०॥*
    संजय धृतराष्ट्रास सांगतो की, “राजा, तीच ही स्थिती श्रीकृष्णांनी स्वतः आपल्या मुखाने अर्जुनास सांगितली “.
*(श्रीकृष्णवचन ऐकून अर्जुनाचे मत व पुढच्या अध्यायाची प्रस्तावना👇👇 ओवी३७१-३७५)*
*🌷ऐसे कृष्णवाक्य ऐकिलें ।तेथ अर्जुने मनीं म्हणितलें ।आतां आमुचियाचि काजा आलें।उपपत्ति इया॥३७१॥*
    हे श्रीकृष्णांनी बोलल्यावर अर्जुन विचार करतो की, ही विचारसरणी आता आमच्या कार्यात बरी पथ्यावर पडली. 
*🌷जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।तरी पारुषलें म्यां झुंजावें ।म्हणूनियां॥३७२॥*
    कारण, *आत्मस्वरूपाचे वर्णन करताना श्रीकृष्णांनी सर्वच्या सर्व कर्माचा येथवरच्या निरूपणात निषेध केला आहे. आणि त्या निषेधामुळे माझे युद्ध करणे हे कर्म थांबले आहे*  असा समज अर्जुनाने करून घेतला आहे. एकीकडे कृष्ण म्हणतात आत्मस्वरूप प्राप्त पुरुषांना कर्मात अडकण्याची गरज नाही. पण मला मात्र म्हणतात की, “तू युद्ध कर.” या द्विधा मनस्थितीत अर्जुन आला आहे.
*🌷ऐसा श्रीअच्युताचिया बोला। चित्तीं धनुर्धरु उवायिला।आतां प्रश्नु करील भला ।आशंकोनियां॥३७३॥*
     ह्याप्रमाणे श्रीकृष्णांचे भाषण ऐकून अर्जुन आपल्या मनात फारच आनंदित झाला. आता तीच शंका घेऊन अर्जुन पुढे चांगला प्रश्न विचारील.
*🌷तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु । कीं विवेकामृतसागरु। प्रांतहीनु॥३७४॥*
    तो प्रसंग फारच सुरस आहे, जणू ते *सर्व धर्माचे उत्पत्तीस्थान अथवा विचाररूपी अमृताचा समुद्रच* आहे. 
*🌷जो आपणपे सर्वज्ञनाथु ।निरुपिता होईल श्रीअनंतु ।ते ज्ञानदेवो सांगेल मातु ।निवृत्तीदासु ॥३७५॥*
     त्या संवादाचे निरूपण सर्वश्रेष्ठ जगदीश्वर स्वतः करतील, आणि तेच निवृत्तीदासु ज्ञानराज माऊली आपणास सांगतील.
*इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायांद्वितीयोऽध्यायः॥*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
*🚩दुसरा अध्याय समाप्त*
*🚩तिसरा अध्याय उद्या पासून*
*🚩¦¦जयजय रामकृष्ण हरि¦¦*
🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

error: Content is protected !!