वंचित बहुजन युवा आघाडी बीड जिल्ह्याच्या महासचिव मा.गौरीताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व फळवाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी (दिनेश लोंढे)बीड, दि.९ – केज तालुक्यात विविध सामाजिक कार्यात हिरहीरीने भाग घेत असलेल्या व महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या गौरीताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त केज येथील हनुमान मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे,वंचित आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष बबलू साखरे,पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद यादव,पत्रकार गौतम बचुटे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराचे उदघाटन झाले.या प्रसंगी गौरीताई शिंदे यांच्या सामाजिक योगदाना बद्दल त्यांचे कौतुक करून अभिष्टचिंतन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामिण विकास मंडळ संस्थेचे सलीम शेख,भीमा कांबळे,सैरंद्रा राऊत व सिंधू अदमाने यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!