बँक कर्जाची सुविधा देतात जाहिरात करतात पंरतु गरिबांसाठी नाही
नवचैतन्य टाईम्स पांचगणी प्रतिनिधी (अमित कांबळे)एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जरी कर्ज प्रकरण केले की. सरकार कर्जाची सुविधा देतात. जाहिरात करतात. बँक कर्जाची सुविधा देतात, जाहिरात करतात. पण हेच बँक सामान्य जनतेचे कर्ज नाकारत आहे. काही ना काही कारण देऊन , दिवस घालवले जातात. बँका तर कर्ज देत नाही.
यामुळे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज प्रकरण जरी केले. तर या ठिकाणी मंजुरी जरी झाली तरी बँक सामान्य जनतेचे कर्ज नाकारले जाते. मग तो सुशिक्षित बेरोजगार असु, होतकरू असु, तरी कर्ज नाकारले जाते. कारण बँकेत शिल्लक रक्कम नाही. पैशाची देवाण घेवाण नाही. GST बिल नाही. आयटी रीटन्स फाईल नाही, सिबिल नाही,अनुभव नाही, कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ राहील, अविश्वास आहे, अश्या अनेक कारणांमुळे कर्ज नाकारले जाते. आणी श्रीमंत लोकांना मात्र कर्ज मंजुरी मिळाली जाते. असे का ?कारण यांच्या बँकेत शिल्लक रक्कम आहे. आयटी रीटन्स फाईल आहे. पैसे आहे म्हणुन सिबिल चांगला आहे. गाडी आहे, विश्वास आहे, ओळख आहे. म्हणून यांना कर्ज मंजुरी मिळत आहे. पण सामान्य जनता देखील काहीतरी उद्योग करण्याचा प्रयत्न करत आहे. यांची सुद्धा तीव्र इच्छा आहे की आपण ही छोटे तरी उद्योजक बनावे. व्यवसायिक बनावे. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. होतकरू विचाराचे बरेच आहे.पण बँका सहकार्य करीत नाही. नवीन व्यवसाय करण्यासाठी GST बिल,आयटी रीटन्स फाईल ची काय गरज आहे.पैश्या अभावी सिबील जास्त नाही. हे का समजु शकत नाही. एखादा व्यवसाय करण्यास किती भांडवल लागेल,यामधून किती उतपन्न होईल. यातुन बँकेचा हफ्ता जाऊन शिल्लक किती राहील,या सर्वाचा विचार करून,स्वतःची प्रगती कशी होईल.हा विचार करूनच कर्जाचा विचार करून ,कर्ज काढण्यासाठी प्रयत्न करतो. पण अश्या पाहिलेले स्वप्नं पूर्ण होण्यासाठी कर्जाची गरज पडते. पण हे स्वप्न पुर्ण होत नाही, �