संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा
नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🌸 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🍃 *अध्याय ४था*
🌸 *ज्ञानकर्मसंन्यासयोग*
♦️ *ओवी २१ पासून*
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳
🌱 *अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि । जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥२१॥*
आस्तिक बुद्धी आडमार्गाने गेल्यामुळे विषयसुख म्हणजेच सर्व काही (इतिकर्तव्य) असे लोकांना वाटून ते जीवाप्रमाणेच विषयरूपी उपाधीवर प्रेम करू लागले.
🌱 *एर्हवीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाऊवें काय करावीं । सांगे जात्यंधा रवी । काय आथी ॥२२॥*
दिगंबराच्या गावात ऊंची वस्त्रांचा उपयोग काय असणार? किंवा जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग?
🌱 *कां बहिरयांचां आस्थानीं। कवणे गीतातें मानी। कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे॥२३॥*
किंवा बहिर्यांच्या सभेत गाण्याला काय मान असणार? अथवा कोल्ह्याला चांदण्यापासून कसा आनंद होईल?
🌱 *पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते । ते काऊळे केवीं चंद्रातें । ओळखती ॥२४॥*
तसेच चंद्रोदयापूर्वी ज्यांचे डोळे फुटतात, मिटतात, ते कावळे चंद्रास कसे ओळखतील?
🌱 *तैसे वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती। ते मूर्ख केंवीं पावती ।मज ईश्वराते॥२५॥*
त्याचप्रमाणे ज्यांनी वैराग्याची शीव सुद्धा पाहिली नाही, ज्यांना विचाराचे नाव देखील माहिती नाही, त्या मूर्खांना मग परमेश्वराचा लाभ कसा होईल?
🌱 *कैसा नेणों मोहो वाढीनला। तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला। म्हणोनि योगु हा लोपला। लोकीं इये॥२६॥*
हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे; पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला. आणि म्हणून या लोकी हा योग बुडाला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
♨ *श्लोक ३)स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः |भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ||४-३||*
अर्थ 👉 _तोच हा पुरातन योग हे सर्व रहस्यातील उत्तम रहस्य म्हणून मी आज तुला सांगितला आहे. कारण तू माझा भक्त व सखा आहेस_
अर्जुनाला कर्मयोग का सांगितला ?
➖➖➖➖➖➖➖➖➖
🌱 *तोचि हा आजि आतां। तुजप्रती कुंतीसुता ।सांगितला आम्हीं तत्वता । भ्रांति न करीं ॥२७॥*
हे कुंतीसुता, खरोखर तोच हा योग तुला आज आम्ही सांगितला आहे, तू काही सुद्धा शंका घेऊ नकोस.
🌱 *हें जीवींचे निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥२८॥*
हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे; परंतु तुजपासून तो लपवून कसा ठेवावा? कारण तू माझा फार आवडता भक्त आहेस.
🌱 *तूं प्रेमाचा पुतळा।भक्तीचा जिव्हाळा ।मैत्रियेची चित्कळा। धनुर्धरा ॥२९॥*
धनुर्धरा! तू केवळ प्रेमाची मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा, जिवलग मित्रत्वाचे तर केवळ जीवन.
🌱 *तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ।जरी संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥३०॥*
आणि तू माझ्या विश्वासाचे पात्र आहेस तेव्हा तुझ्याशी मी काय प्रतारणा करू? म्हणून आपण युद्धास सिद्ध झालो आहो तरी
🌱 *तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें। परी तुझें अज्ञानत्व हरावें। लागे आधीं॥३१॥*
युद्धाची गडबड चालली असतानाही ती क्षणभर एका बाजूला ठेवून त्यास न जुमानता प्रथम तुझे अज्ञान आम्हास दूर केले पाहिजे.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🌹 *ओवी३२ पासून उद्या*
🌿 *¦¦जयजय रामकृष्णहरि¦¦*