जत आगारातून अखेर लालपरीची सेवा सुरु तालुका शिवसेनेचे शर्तीचे प्रयत्न मा.दिनकर पतंगे व मा अंकुश हुवाळे यांच्या पुढाकाराने वाहतुकीस चालना

जत नवचैतन्य टाईम्स प्रतिनिधी(नजीरभाई चट्टरकी)जत तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने सांगली जिल्ह्यातील जत आगारातून आज सोमवार दिनांक २२नोव्हेंबर रोजी एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. जत आगारातून जत ते सांगली अशा चार बस गाड्या सोडण्यात आल्या यासाठी महाराषट कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री दिनकर पतंगे शिवसेना तालुकाप्रमुख पूर्व भाग श्री अंकुश हुवाळे कामगार सेनेचे शंकर कॉलनी शाखाप्रमुख भीमराव आडासुडे प्रभाग क्रमांक 10 चे शाखाप्रमुख श्री अब्बास मुजावर युवा सेना शहर प्रमुख मा. ज्ञानेश्वर धुमाळ इत्यादी शिवसैनिकांच्या प्रयत्नाने तसेच डेपो मॅनेजर मा. घुगरे साहेब तसेच त्यांचा कर्मचारी वर्ग वजत पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने तुर्त तरी चार गाड्या सुरक्षितरित्या जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय डुबल यांनी दिलेल्या पोलीस संरक्षणात शहरातून बाहेर काढण्यात आल्या.यावेळी कामगार सेना व शिवसेना व तसेच युवा सेनेच्या वतीने सदर गाड्यांचे व वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला तसेच एसटी मध्ये बसलेल्या प्रवाशांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.अत्यंत जिकिरीने या गाड्या सोडल्यामुळे व चार ही गाड्या सांगली स्टॅन्ड ला जावून विना रोक टोक व्यवस्थित परत आल्याने लवकर जत आगारात प्रमाणे सर्वच आगारातून गाड्या सोडल्या जातील आणि प्रवाशांची गैरसोय दूर केली जाईल यातूनच राज्यपातळीवर याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा मा. दिनकर पतंगे यांनी व्यक्त केली आहे..

error: Content is protected !!