संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
🍁 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🍀 *अध्याय सहावा*
🍁 *ध्यान योग*
🍀 *ओवी ५१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🍂म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणापांचि ॥५१॥*
     म्हणून श्रौतस्मार्तहोमादिक कर्माचे यथाविधि आचरण न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्या जवळ सहजानुसार योगसुख आहे. 
➖➖➖➖⭕➖➖➖➖
*🌻यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव|न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥६-२॥*
अर्थ 👉   _अर्जुना, ज्याला संन्यास म्हणतात तो योग आहे असे जाण. ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही_
➖➖➖➖⭕➖➖➖➖
*🍂ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥५२॥*
     ऐक, *संन्यासी तोच योगी* असा एकवाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे. 
*🍂जेथ संन्यासिला संकल्पु तुटे।तेथचि योगाचें सार भेटे।ऐसें हें अनुभवाचेनि धटें।साचें जया॥५३|*
    ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग झाल्यामुळे संकल्प नष्ट झाला, त्याच ठिकाणी, योगाचे सार जे ब्रह्म त्याची भेट होते. असे स्वानुभवाच्या प्रमाणाने ज्याचे ठरले आहे. 
➖➖➖➖⭕➖➖➖➖
*🚩आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते|योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥६-३॥*
अर्थ 👉  _योग प्राप्त व्हावा अशी इच्छा करणार्‍या मुनीला कर्म हे साधन आहे असे सांगितले आहे. योग प्राप्ती झाल्यानंतर त्यालाच शम हे साधन सांगितले आहे._
➖➖➖➖⭕➖➖➖➖
*🍂आतां योगाचळाचा निमथा।जरी ठाकावा आथि पार्था।तरी सोपाना या कर्मपथा।चुका झणीं॥५४॥*
     पार्था, अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची  इच्छा असेल, त्याने कर्ममार्गरूपी जिना चढण्यास चुकू नये. 
*🍂येणें यमनियमाचेनि तळवटें।रिगे असनाचिये पाउलवाटें।येई प्राणायामाचेनि आडकंठें।वरौता गा॥५५॥*
     या कर्ममार्गाने जावयास लागले म्हणजे प्रथम या पर्वताचा यमनियमरूपी तळ लागतो; नंतर आसनांच्या पाऊलवाटेने प्राणायामरूप कड्याने वर जावे लागते. 
*🍂मग प्रत्याहाराचा आधाडा|बुध्दीचियाहि पाया निसरडा।जेथ हटिये सांडिती होडा।कडेलग॥५६*
    नंतर प्रत्याहार हाच कोणी अर्धा तुटलेला कडा लागतो, त्याच्यावरून बुद्धिचेही पाय निसटतात. आणि तो तुटलेला कड्याचा मार्ग ओलांडताना कडेलोट होईल म्हणून हठयोग्यांच्या सुद्धा प्रतिज्ञा शेवटास जात नाहीत. 
*🍂तरी अभ्यासाचेनि बळें।प्रत्याहारीं निराळें।नखी लागेल ढाळें ढाळें। वैराग्याची॥५७॥*
    परंतु अभ्यासाच्या बळाने प्रत्याहाररूप शून्यासारख्या कठीण मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू चढू शकते.
*🍂ऐसा पवनाचेनि पाठारें।येतां धारणेचेनि पैसारें।क्रमी ध्यानाचें चवरें। सांडे तंव॥५८॥*
    अशा रीतीने, वायूरूप घोड्याच्या पाठीवर बसून मार्ग क्रमित असता चित्त स्थिर करण्याच्या विस्तृत जागेवर आल्यानंतर ध्यानाचा शेवट स्वाधीन होईपर्यंत मार्गक्रमण करतो. 
*🍂मग तया मार्गाची धांव।पुरेल प्रवृत्तीचि हांव।जेथ साध्यसाधना खेंव।समरसें होय॥५९॥*
     मग ज्या ठिकाणी साध्य व साधन एक होतात, त्या ठिकाणी मार्गाची धाव व प्रकृतीची हाव संपते.
*🍂जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिया सरिसीये भूमिके । समाधी राहे ॥६०॥*
    आणि ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही आठवण राहत नाही, अशा समान भूमिकारूप समाधीवर तो पुरुष राहतो.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🚩 *ओवी ६१ पासून उद्या*
🚩 *|जयजय रामकृष्ण हरी|*

error: Content is protected !!