संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
*9820275869*
🌿 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌹 *अध्याय सहावा*
🌿 *ध्यान योग*
🚩 *ओवी १२१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🌹हें असो वयसेचिये शेवटीं।जैसें एकचि विये वांझोटी।मग ते मोहाची त्रिपुटी। नाचों लागे॥१२१॥*
    हे असो; एखाद्या वांझ स्रीला, तिचे वय होऊन गेल्यानंतर एकच मूल झाले म्हणजे ती जशी त्याच्यावरील प्रेमाची प्रत्यक्ष पुतळी होऊन नाचू लागते.
*🌿तैसें जाहले अनंता।ऐंसे तरी मी न म्हणतां।जरी तयाचा न देखतां।अतिशयो एथ॥१२२॥*
    तशी श्रीकृष्णांची गोष्ट झाली आहे. त्यांचे अर्जुनावरील अतिशय प्रेम जर दृष्टोत्पत्तीस न येते, तर मी असे बोललो नसतो.
*🌹पाहा पां नवल कैसें चोज।कें उपदेशु केउतें झुंज।परी पुढें वालभाचे भोज।नाचत असे ॥१२३॥*
    पहा की, हे काय नवल व ही कोण आवड? की कसला युद्धप्रसंग आणि हा काय उपदेश? परंतु अशा ठिकाणी भगवंताच्या प्रीतीचे चित्र जो अर्जुन, त्याच्यापुढे प्रेमाचे कौतुक मूर्तिमंत नाचत अाहे.
*🌿आवडी आणि लाजवी।व्यसन आणि शिणवी।पिसें आणि न भुलवी।तरी तेंचि काइ॥१२४॥*
     लज्जा उत्पन्न करणारी आवड, शीण उत्पन्न करणारे व्यसन, व न भुलविणारे पिशाच अशा गोष्टी दृष्टीस पडतील, तर काय उपयोग? 
*🌹म्हणउनि भावार्थु तो ऐसा।अर्जुन मैत्रियेचा कुवासा।कीं सुखे श्रृंगारलिया मानसा।दर्पणु तो॥१२५॥*
     या गोष्टीचे सार इतकेच की, अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर होय किंवा सुखाने शृंगारलेले आपले मन पाहण्याचा आरसाच होय. 
*🌿यावरी बाप पुण्यपवित्र।जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र।तो कृष्णकृपे पात्र।याचिलागीं ॥१२६॥*
    अशा प्रकारे अर्जुन हा धन्य, पुण्यपवित्र आणि भक्तिरूप बीज पेरण्याचे उत्तम शेत असल्यामुळेच श्रीकृष्णकृपेस प्राप्त झाला.
*🌹हो का आत्मनिवेदनातळींची।जे पीठिका होय सख्याची।पार्थु अधिष्ठात्री तेथिंची।मातृका गा ॥१२७¦¦*
    श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यत जी नऊ प्रकारची भक्ती आहे. त्यापैकी आत्मनिवेदनाच्या अलिकडची जी सख्य नावाची आठवी भक्ती, त्या ठिकाणची अर्जुन हा मुख्य देवता आहे.
*🌿पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुने तो सहजें । पढिये हरी ॥ १२८ ॥*
     भगवान श्रेष्ठ शेजारी असता त्याचे वर्णन केले असता मालकाला आवडावे अशा योग्यतेचा अर्जुन हा भगवंताचा आवडता आहे.
*🌹पाहां पां अनुरागें भजे।जे प्रियोत्तमें मानिजे।ते पतीहून काय न वर्णिजे।पतिव्रता ॥१२९॥*
    जी पतिव्रता स्त्री आपल्या पतीची प्रीतीने सेवा करिते आणि पतीस मान्य होते, त्या पतिव्रतेची पतीपेक्षा वाखाणणी का करू नये? 
*🌿तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा।ऐसें आवडलें मज जीवा।जे तो त्रिभुवनाचिया दैवां।एकायतनु जाहला ।।१३०॥*
     त्याचप्रमाणे अर्जुनाचीच विशेष स्तुति करावी असे माझ्या मनास वाटले. कारण तो त्रिभुवनाच्या भाग्याला प्राप्त झाला आहे.
⛳⛳⛳🔔🐚🔔⛳⛳⛳
🍀 *ओवी १३१ पासून  उद्या*
🌻 *||जयजय रामकृष्ण हरि||*

error: Content is protected !!