पेन्शनर्स-ज्येष्ठांनी आनंदी जीवन जगावे-डॉक्टर मनोहर मोदी

नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी) :-“वृद्धापकाळ सुखाचा समाधानाचा, आनंदाचा जावा म्हणून पूर्वायुष्यात सकारात्मक दृष्टि ठेवून काळ व्यतीत केला असेल तर म्हातारपणातील कष्टप्रद जीवनही सुसह्य पणे घालविता येणे शक्य आहे. नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घेतली की आयुष्यात आपोआप सकारात्मक घटनाच घडायला लागतात . ज्येष्ठ नागरिकांनी तसेच सेवानिवृत्तांनी एखाद्या समाज उपयोगी कामात स्वतःला गुंतवून घेणे श्रेयस्कर ठरेल.रोज काहीतरी नवीन निर्माण करावे किंवा नवीन शिकावं यावर भर असला पाहिजे. नवनिर्मिती करण्यातील आनंद वेगळाच. ज्येष्ठांच्या आचार, विचार व संस्कार यामुळे जीवनाला आकार मिळतो. संस्कृती व संस्काराचे ते खरे ग्रँड फादर आहेत.समाजातील सुसंस्कृतपणा टिकविण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.’वाचाल तर वाचाल ‘असे प्रतिपादन जत अर्बन बँकेचे चेअरमन डॉक्टर मनोहर मोदी यांनी केले.जत तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘पेन्शनर्स डे’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना ज्येष्ठांना जुनी गाणी व संगीत ऐकण्याचा सल्ला देऊन वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधित झालेल्या पद्धतींचा उलगडा केला. पेन्शनर्स चे अध्यक्ष प्रा.डॉ.शिवाजीराव बिसले यांनी संघटनेने केलेल्या विविध उपक्रमांचा व भविष्यकालीन योजनांचा आढावा घेऊन सर्व सभासदांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रमोद पोतनीस म्हणाले,”भगवत गीता ही,काही एकाच देशासाठी,सांप्रदायासाठी ,धर्मासाठी ,पंथासाठी नसून ती सर्वासाठीच चिरंतन मूल्ये म्हणून उपयोगी आहे.” डॉक्टर मनोहर मोदी यांची जत अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अध्यक्षांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ.शिवाजीराव बिसले यांना महाराष्ट्रातून एकमेव, ‘एस.एम.जोशी ‘सेवानिवृत्त पुरस्कार पुणे येथे मिळाल्याबद्दल तसेच महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.वय वर्षे 75 ,80 वर्षे व 85 वर्षे पूर्ण तसेच डिसेंबर 2021 मध्ये वाढदिवस असणाऱ्या सर्व सभासदांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.पेन्शनर्स असोसिएशनच्या सर्व कार्य पद्धतीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून गुरुमूर्ती जेऊर,रामण्णा तंगडी यांचा तसेच नवीन सभासदांचाही प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.सत्कारमूर्ती हिराचंद मालगते,प्रा.डॉक्टर पांडुरंग गावडे, सौ यशोदा शिवाजी मोटे यांची नात, प्रा.डॉ.शिवाजीराव बिसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सोलापूरे सर, शंकर बुवा ,युनुस हैदराबादे,नुर मुहम्मद मुल्ला,ईश्वराप्पा आरळी,शिदलिंगप्पा जेऊर,रामचंद्र शिंदे,शंकर परदेशी, रावसाहेब कोरे,संतु हजारे, ज्योतिबा चव्‍हाण, चंद्रकांत थिटे, मकबूल शेख,विठ्ठल गडदे, सिद्राया पेंगे,गुरुबाळ तंगडी,मल्लिकार्जुन आरळी, गुलाब शिंदे,शंकर जाधव,नंदकुमार गुरव आदी उपस्थित होते.
माजी तहसीलदार सुलतान नदाफ यांनी आभार मानले.प्राध्यापक चंद्रसेन माने-पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

error: Content is protected !!