आम्ही दादागिरीने नाही तर प्रेमानेच माणसे जिंकतो- आमदार शशिकांत शिंदे

नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(कदिर मणेर)आज कुडाळ गावचे उपसरपंच सोमनाथ कदम यांचे वडील मा.श्री लक्ष्‍मण पांडुरंग कदम (निवृत्त पोलिस हवालदार मुंबई) यांच्या जन्मदिनानिमित्त सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा,निवृत्त पोलिस,ज्येष्ठ नागरिक,आरोग्य कर्मचारी, सलून व्यवसायिक,कृषी क्षेत्र, सामाजिक क्षेत्र,राजकीय क्षेत्र आणि विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार यांचा सन्मान सोहळा तुळजाभवानी मंदिर कुडाळ येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रामुख्याने विधान परिषदचे आमदार मा.श्री शशिकांत शिंदे साहेब,माजी आमदार श्री सदाभाऊ सपकाळ, माजी सभापती अर्थ व शिक्षण जिल्हा परिषद श्री अमीत दादा कदम,जावली पंचायत समिती सभापती मा.सौ जयश्री ताई गिरी,मा.श्री योगेश गोळे (चेअरमन डी.एम.के सहकारी बँक जावली), माननीय माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री वीरेन्द्र शिंदे,माजी उपसरपंच गणपत कुंभार,माजी ग्रामपंचायत सदस्य संजू काका शिंदे,ज्येष्ठ मार्गदर्शक मा.श्री प्रकाश दादा रासकर,प्रतापगड कारखान्याचे संचालक जितेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप वारगडे,धैर्यशील शिंदे, कांबळे गुरुजी,सचिन पाटील, निवृत्त पोलिस सूर्यकांत (तात्या) शिंदे,आदी मान्यवरांचा सत्कार घेण्यात आला.तसेच या वेळेस विविध क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेऊन भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात आमदार शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले…. आम्ही दादागिरीने नाही तर प्रेमानेच माणसे जिंकतो.आमच्यावर आफाट प्रेम जावळीच्या जनतेने कायमच केले आहे आणि आजही करत आहे. तसेच आम्ही तळमळीने काम करणाऱ्या उपसरपंच सोमनाथ कदम सारख्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे कायमच उभे राहू,मी जरी आडनावाने शिंदे असलो तरी मीही भावकी धर्म पाळतो त्यामुळे आपल्या सोमनाथच्या पाठीमागे एक मोठा भाऊ म्हणून मी नेहमीच सोबत असेन असे सर्वांसमोर आश्वासन देतो.आम्ही जनमानसातील माणसे आहोत असा टोला यावेळेस त्यांनी विरोधकांना लावला आहे. या कार्यक्रमाला कुडाळ पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री घुले सर, कार्यक्रमाचे मनोगत अविनाश गोंधळी आणि सूत्रसंचालन पिंपळबन अध्यक्ष महेश पवार यांनी केले आहे.संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक म्हणून तुळजाभवानी मित्र मंडळ कुडाळ,साई चौक कुडाळ आणि महेश दादा मित्रपरिवार यांनी व्यवस्थित रित्या कार्यक्रम पार पाडला .

 

error: Content is protected !!