श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयासमोर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा उपोषणाचा इशारा

नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)-श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर येथे एका भ्रष्ट कर्मचाऱ्यास धार्मिक व्यवस्थापक पदी पदोन्नती केली असून ही बाब श्री तुळजाभवानी मंदिराच्या प्रतिष्ठेसाठी अतिशय निंदनीय आहे तसेच सदरील व्यक्ती हा प्रचंड भ्रष्टाचारी असून मंदिरातील लालूप्रसाद घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून नऊ पैकी आठ दोषारोप त्यांच्यावर सिद्ध आहेत, त्याचबरोबर सध्या व्हीआयपी पासची अफरातफरी करण्यात त्या व्यक्तीचा मोठा हात आहे,आजपर्यंत भ्रष्टाचार निर्मूलन समितीने आपल्या कार्यालयास म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत वारंवार तक्रार व पाठपुरावा करून देखील सदर घटनेची दखल घेण्यात आली नाही जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्र व दैनिक साप्ताहिक न्यूज चॅनेल यांच्यामार्फत आपल्या निदर्शनास आणुन सुध्दा आपण सदर बातमीला केराची टोपली दाखविला असुन सदर प्रकरणाची आपल्या कार्यालयातून कुठल्याही प्रकारचे प्रत्युत्तर न मिळाल्यामुळे निराशा व्यक्त करत आहोत सदरील अधिकारी हा कर्मचारी असताना गैरमार्गाने जनसंपर्क अधिकारी या पदावर नियुक्त झाला होता,सध्या मंदिर संस्थानने अशी अफरातफरी करणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यावर मोठी पदोन्नती देऊन भ्रष्टाचारास पाठिंबा दिला आहे असे सिद्ध होते, असे निवेदनावर नमूद केले आहे त्याचबरोबर याच पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या या कारभारावर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर यांच्या कार्यालयासमोर दिनांक 09/02/2122 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत असे निवेदनावर नमूद केले आहे,माहितीस्तव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त न्याय विभाग मुंबई,उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पत्राद्वारे कळवले आहे.निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांची स्वाक्षरी आहे.

error: Content is protected !!