संत ज्ञानेश्वरांची यशोगाथा

नवचैतन्य टाईम्स ठाणे प्रतिनिधी(सचिन शिंदे)
*9820375869*
🍀 *सार्थ ज्ञानेश्वरी*
🌸 *अध्याय ७ वा*
🍀 *ज्ञानविज्ञानयोग*
🌹 *ओवी ८१ पासून*
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳
*🚦तया पाणियाचेनि वहिलेपणें ।अझुनी न धरती वोेभाणें ।ऐसा मायापूर हा कवणें ।तरिजेल गा ।।८१।।*
    त्या पुराच्या प्रवाहात अजून कोणाचे पाय लागत नाहीत! अरे, असा हा मायापूर कोणाच्याने तरून जाणवेल. 
*🚦येथ एक नवलावो |जो जो कीजे तरणोपावो ।तो तो अपावो ।होय तें ऐक ।।८२।।*
     आणखी येथे एक मोठेच नवल आहे; ही नदी तरून जाण्याला जे जे उपाय करावे, ते ते अपायकारकच होतात!
*🚦एक स्वयंबुद्धीचां बाहीं ।रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं ।एक जाणिवेचां डोहीं ।गर्वेंचि गिळिले ।।८३।।*
     कोणी आपल्या बुद्धीच्या बळावर (नदी तरून जावे म्हणून) मध्ये उडी टाकली, त्यांचा पत्ताच नाही; कोणाला ज्ञानरूपी डोहात गर्वाने पार गिळून टाकले; 
*🚦एकीं वेदत्रयाचिया सांगडी ।घेतलिया अहंभावाचिया धोंडी ।ते मदमीनाचां तोंडीं ।सगळेचि गेले ।।८४।।*
     कोणी वेदत्रयीच्या सांगडीवर बसून तिच्याखाली मीपणाचे धोंडे बांधून या मायारूप नदीतून तरून जाण्यास निघाले. ते मदरूपी माशाच्या तोंडात सबंधच नाहीसे झाले,
*🚦एकीं वयसेचें जाड बांधलें ।मग मन्मथाचिये कांसे लागले ।ते विषयमगरीं सांडिले ।चघळूनियां ।।८५।।*
  कोणी तारुण्याच्या बळाने कंबर कसून मदनाच्या कासेला लागले, तो त्यांना विषयरूप सुसरीनेच चघळून टाकिले.
*🚦आतां वृद्धाप्याचिया तरंगा- ।माजीं मतिभ्रंशाचा जरंगा ।तेणें कवळिजताति पैं गा ।चहूंकडे ।।८६।*
     मग ते वार्धक्यरूप लाटांमध्ये तरंगत जात असता मतिभ्रंशरूप जाळ्यात सापडतात व त्यायोगे चहूकडून जखडले जाऊन शोकरूप कड्यावर आदळतात, 
*🚦आणि शोकाचां कडा उपडत ।क्रोधाचां आवर्तीं दाटत ।आपदागिधीं चुंबिजत ।उधवला ठायीं ।।८७।।*
      पुढे क्रोधरूपी भोवर्‍यात सापडले असता कोठे वर डोके करावयास लागले, की आपत्तिरूप गिधाडे त्यास टोचटोचून खाऊ लागतात ; 
*🚦मग दु:खाचेनि बरबटें बोंबले ।पाठीं मरणाचे रेवें रेवले।ऐसेकामाचिये कांसे लागले ।ते गेले वायां ।।८८।।*
     आणि मग ते दुःखरूप चिखलात फसून मरणरूप वाळूत रुतले जातात! अशाप्रकारे जे विषयाच्या मागे लागले ते फुकट जातात. त्यांचे जिणे व्यर्थ होते. 
*🚦एकीं यजनक्रियेची पेटी ।बांधोनि घातली पोटीं ।तें स्वर्गसुखाचां कपाटीं ।शिरकोनि ठेले ।।८९।।*
     कोणी यज्ञादिक क्रियारुपी पेटी बांधून पोटाखाली घेतात; ते स्वर्गसुखरूपी कपारीत अडकून राहतात. 
*🚦एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा ।केला कर्मबाह्यांचा भरंवसा ।परी ते पडिले वळसां ।विधिनिषेधांचां ।।९०।।*
    कोणी मोक्षप्राप्तीच्या आशेने कर्मरूप बाहुबलावर भरंवसा ठेवतात ; परंतु कर्तव्याकर्तव्यांच्या वळणात पडतात.
⛳⛳⛳🐚🔔🐚⛳⛳⛳
🌹 *ओवी ९१ पासून उद्या*
🍀 *¦जयजय रामकृष्ण हरि¦*

error: Content is protected !!