बोरगावच्या खाजगी सावकारावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(आशिष चव्हाण)वाई तालुक्यातील बोरगाव येथील खाजगी सावकारी करणाऱ्या एका विरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अनिल तानाजी जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचे मप्रो कंपनी लगत स्वराज नावाचे हॉटेल आहे. त्याकरिता भांडवल कमी पडत असल्याने बोरगाव येथील खाजगी सावकार राजेंद्र आनंदा वाडकर याच्याकडे 1 लाख रुपये हात उसने मागितले. तेव्हा वाडकर याने मी एवढी मोठी रक्कम हात उसने देऊ शकत नाही. घ्यायचे असेल व्याजाने घे त्यावर जाधव म्हणाले व्याज किती ते वाडकर याने शेकडा दहा टक्के असे सांगितले. 1 लाख रुपये घेताना वाडकर याने व्याजाचे दहा हजार काढुन घेतले तसेच दर महिन्याला व्याजाचे दहा हजार दिले होते. तर जानेवारी 2020 मध्ये 30 हजार, फेब्रुवारी 2020 मध्ये 50 हजार रूपये दिले तरीही जाधव याला आठ दिवसापासून वाडकर याने फोन वरुन शिवीगाळ करून पैशाचा तगादा लावला असून त्याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाई पोलीस तपास करत आहेत.