चला माय मराठी समृद्ध करूया

नवचैतन्य टाईम्स वाई प्रतिनिधी(अमोल मांढरे)आपला महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी मानली जाते. छत्रपती शिवाजी महाराज ,छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक ,शाहू महाराज, महात्मा फुले ,आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,. या महापुरुषांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असणाऱ्या महाराष्ट्राचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमानच आहे. संतांनी आपल्या काव्यातून आणि ग्रंथातून जन माणसांना योग्य ती दिशा दिली. आणि हे सर्व मराठी आपल्या मातृभाषेतूनच. या आपल्या मराठीचा सर्व मराठी माणसांना सार्थ अभिमानच आहे. आणि तो भविष्यातही कायम राहील. मराठी या समृद्ध मातृभाषेतूनच जे ज्ञान महापुरुषांनी आणि संतांनी जन्म माणसांना दिले त्यापासून मिळणारी ऊर्जा ही शेकडो वर्षापासून आजही टिकून आहे. आणि हीच ती ऊर्जा भविष्यामध्ये आपल्या मराठी जन माणसांना सर्वांना संकटाशी लढण्यासाठी एक संजीवनीच आहे. तेव्हा या आपल्या माय मराठीचे समृद्ध वारसा जोपासणे हे आपले सर्वांचे एक आद्य कर्तव्यच आहे. वाढत्या जागतिकीकरणामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, इंग्रजीला आपण आपल्या जीवनात योग्य स्थान दिले आहेत परंतु त्याचबरोबर समृद्ध मराठी भाषा टिकवण्यासाठी ही शासनाबरोबर जन माणसांमध्ये प्रबोधन होणे अत्यावश्यक आहेच. तेव्हा यासाठीच प्रत्येक शाळेमध्ये मराठी विषय अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने ही योग्य ती पावले टाकून त्याबाबत योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी पहिल्या प्रयत्न हा आपल्या मराठी मातीतूनच झाला. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या राजकीय ,सामाजिक , सांस्कृतिक वगैरे क्षेत्रात बहुमोल कार्य हे माय मराठीतूनच झाले. तेव्हा या मायभूमीच्या भविष्यातील रक्षणासाठी आपण साहित्यिक व पत्रकार यांनीही आपले आद्य कर्तव्य समजून कार्य करणे गरजेचे आहे. कविसंमेलन, साहित्य संमेलन, व्याख्यानमाला, यातून मराठी भाषा समृद्ध तर होईलच परंतु त्याच बरोबर माय मराठीचे महत्त्व हे आपल्या नवीन पिढीलाही नक्कीच उमजेल. त्याचबरोबर दर्जेदार मराठी चित्रपट व नाटक यांच्यामार्फत ही माय मराठीचे संवर्धन जोपासणे शक्य होईल. तेव्हा सर्व जण माणसांची लाडकी असलेली मराठी भाषा ही भविष्यात ही पुढील शेकडो वर्षे आपल्या सर्वांना ज्ञान समृद्धी देईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी मराठी रंग मराठी. धन्यवाद.
कविराज अमोल मांढरे.वाई. जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.

error: Content is protected !!