नंदगुल तांडा येथुन बारावीच्या परीक्षेला मोटर सायकलने निघालेला विद्यार्थी अर्जुन राठोडचा पहिल्या पेपरच्या दिवशी कंटेनरच्या धडकेने अपघाती मृत्यु

नवचैतन्य टाईम्स उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी(आशा वाघ)आज संपुर्ण राज्यात बारावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला आहे. मात्र बस बंद असल्यामुळे ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी बरीच कसरत करावी लागली आहे.नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी अर्जुन गोविंद राठोड वय १९ वर्ष रा. नंदगुल तांडा, बोरनदीवाडी, ता. तुळजापुर हा विद्यार्थी नंदगुल तांडा येथुन मोटारसायकल वरून क्र. एम. एच.२५ झेड ६१९० नळदुर्ग कडे येत होता. यावेळी नळदुर्ग–तुळजापुर रस्त्यावर नळदुर्ग हद्दीत गंधोरा शिवारातील हॉटेल सह्याद्री समोरील वळणावर समोरुन येणाऱ्या कंटेनरने क्र.आर. जे.३२/जी. सी. ०५४५ अर्जुन राठोड याच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.या अपघातामध्ये अर्जुनचा जागीच मृत्यु झाला. अपघाताची माहिती मिळताच अर्जुनचे नातेवाईक तात्काळ घटनास्थळी येऊन गोंधळ करण्यास सुरुवात केले मात्र पोलिसांनी त्यांना समजावल्याने वातावरण शांत झाले.परीक्षा द्यायला चाललेल्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यु झाल्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.बस बंद असल्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात बसत आहे. निदान परीक्षा कालावधीत तरी महामंडळाने परीक्षेच्या वेळेत ग्रामिण भागात बस चालु करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आज अनेक विद्यार्थी, विद्यार्थीनी खाजगी वाहन किंवा मोटारसायकलवरून परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.भविष्यात दुर्घटना घडुन आणखी कुणाचा बळी जाऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.या अपघाताची नोंद नळदुर्ग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

error: Content is protected !!