मुंबई येथील जीवनदाता सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमीत्य केईएम रुग्णालयांमध्ये महिला करणार रक्तदान

नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(मिलिंद सावंत) ८ मार्च ‘जागतिक महिला दिन’ म्हणजे महिलांच्या हक्काचा दिवस. हा दिवस महिला अनेक प्रकारे साजरा करतात. कोणी पिकनिक काढतात, कोणी पार्टी करतात, कोणी वेगवेगळे मनोरंजन करत असतात. राजकीय पक्ष व इतर सामाजिक मंडळी या दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवतात.खूप काही फुकट वाटले जाते.पण याला अपवाद आहे ते केईएम रुग्णालयांमध्ये होणारे, केवळ महिलांसाठीच असणारे विशेष रक्तदान शिबिर.”घे भरारी रक्तदानासाठी” या संकल्पनेवर आधारित जीवनदाता सामाजिक संस्था गेली दोन वर्ष महिलांना रक्तदानाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. महिला रक्तदानात मागे आहेत, हा शिक्का कायमचा नाही, पण थोड्याफार प्रमाणात प्रमाणात पुसण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलांना आणण्याचा हा प्रयत्न.
मार्च २०२० ला सुरू केलेला या अभिनव सामाजिक उपक्रमात पहिल्याच वर्षी जवळपास ४०० महिलांनी हजेरी लावली. यावरून महिलांना रक्तदानासाठी संधी हवी असते याची जाणीव झाली व ती संधी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जीवनदाता संस्थेने केवळ महिलांसाठीच रक्तदान शिबिराचा एक वेगळा स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिली आहे.
‘स्त्री’ म्हटली की अनेक समस्या त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. असे म्हटले जाते.त्यातील मोठी समस्या म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता पण असे असून सुद्धा कितीतरी महिला रक्तदानासाठी पुढे येतात,न घाबरता रक्तदान करतात.अभिमान वाटतो अशा महिलांचा.यातून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे सर्वच महिलांचे हिमोग्लोबिन कमी नसते.खूप वर्षापुर्वी कधीतरी चेक केलेली हिमोग्लोबिन पातळी.हाच न्यूनगंड महिलांना स्वतःहूनच रक्तदान पासून परावृत्त करीत असतो.जीवनदाता संस्थेने’घे भरारी रक्तदानासाठी’म्हणत सर्व महिला वर्गाला साद घातलेली आहे. रक्तदान करण्यास प्रयत्न करण्यात काय हरकत आहे.किमान त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी तरी कळू शकेल.या निमित्ताने महिलांची एकजूट दिसून येते. त्यांच्यातील समाजासाठी काहीतरी करण्याची भावना दिसून येते. ‘होय मी रक्तदान करणारच’ हे ध्येय दिसून येते.या वर्षी संस्थेने लाल रंगाचा ड्रेसकोड ठेवलेला आहे.जीवनदाता संस्थेमार्फत सर्व महिलावर्गाला रक्तदान करून तर बघा,आनंद मिळेल.अशी साद घालत ‘घे भरारी रक्तदानासाठी’संकल्पना मांडली आहे.या महिला विशेष रक्तदान शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सदस्य नितीन कोलगे यांच्या मातोश्री श्रीमती सत्यवती सत्यवान कोलगे यांच्या हस्ते होणार आहे.८ मार्च २०२२ जागतिक महिला दिनी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत केईएम रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये हे केवळ महिलांसाठी असलेले विशेष रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.महिलांनी हा दिवस सामाजिक कार्य, रक्तदान करून साजरा करावा.असे आवाहन जीवनदाता सामाजिक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क मीनल कुडाळकर ८२०८६१४४६० आरोही काळे ८०८२५०७१९३ विजया जाधव ८९२८५१६५३६ व रक्तपेढी समुपदेशक
कविता ससाणे ९१३७५५३७७४ यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!